मुख्यमंत्री कुणीही व्हा, पण आमचा लिलाव थांबवा-नाना

October 4, 2014 10:25 PM2 commentsViews: 6719

nana_patekar_pune_pc04 ऑक्टोबर : तुम्ही कोणीही काहीही करा रे बाबांनो…,पण आमचं भलं करा आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जरा तुम्ही पूर्ण करा पण आमचा लिलाव थांबवा असं परखड मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. तसंच शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे त्यांचा आजपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे त्यांच्यावर कुणी टीका करत असेल तर ती चुकीची आणि दुर्देवी आहे असंही नाना म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

डॉ.प्रकाश बाबा

 

आमटे यांच्या जीवनसंघर्षावर ‘प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट लवकरच प्रसिद्ध होत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारलीये. आज (शनिवारी) या चित्रपटांच्या निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी नानांनी मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीवर आपल्या शैलीत समाचार घेतला. मुख्यमंत्री कुणीही होऊ द्या, सरतेशेवटी आपल्या जनसामान्यांचं एकच मत आहे. तुम्ही कुणीही काहीही करा पण आमचं भलं करा, आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करा पण जर तुम्ही त्या पूर्ण करत नसाल तर मग कशासाठी आहात तुम्ही तिथे?, सरतेशेवटी हे जे सगळं करणार आहात ते आमच्यासाठीच ना? आणि मग आमच्यासाठी करणार आहात तर त्याचा आमचाचं लिलाव चालल्यासारखं आम्हाला वाटतं, ते पाहिल्यानंतरआम्हाला हतबल होऊन नुसतं बघण्याच्या पलीकडे आमच्याकडे काहीच नाहीये असं मत नानांनी व्यक्त केलं.

‘शरद पवारांवर टीका चुकीची’

शरद पवार हे आता वयाने मोठे, सिनिअर आहेत आणि त्यांचा जर दुसर्‍या पिढीशी जर संवाद राहिलेला नसेल आणि दुसरी पिढी जर त्यांचा जो अनुभव आहे. त्याचा उपयोग करून घेत नसेल तर हे दुदैर्व आहे. पवारांचा सगळा प्रवास मी पाहिलेला आहे. त्यांना असा छान शिखरावर मी पाहिलेलं आहे. त्यांच्याबद्दल कोणी एखादा गैरशब्द बोलल्यानंतर वाईट वाटतं असंही नाना म्हणाले. तसंच राज्याच्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही. शरद पवार अणि नितीन गडकरींनी दरवाजे उघडे ठेवले आहे. इतरांनीही तसंच करायला हवं होतं असं मतंही नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Balasaheb

    SP, BSP AAP kept silent on corrupt congress who was in power and targeted Modi in Loksabha polls, result was clean swipe for BJP… Sena , MNS targeting Modi but are silent on corrupt congress govt in power…will BJP benefit this time also ? what do you think?

  • abbas

    sharad baddal kasala vait vatayche hi family jevha khapel tevha maharashtrach bhal hoil

close