31 मेला पुण्यात रेहमानची होणार लाईव्ह कॉन्सर्ट

May 27, 2009 4:38 PM0 commentsViews:

27 मे ऑस्करवारी नंतर पहिल्यांदाच रहमानचा पहिला वहिला शो पुण्यातल्या बालेवाडीत होत आहे. तोही येत्या 31 मेला. त्यासाठी पुण्यात जय्यत तयारी चालु झाली आहे. जागोजागी कार्यक्रमाचे फलक लागले आहेत. बालेवाडीत खास शो साठी तीन मजली स्टेज उभारलं जात आहे. या कार्यक्रमाला जवळजवळ 25 ते 30 हजार प्रेषक उपस्थित राहणार असून साऊंड आणि व्हिज्युअलससाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. भारतात पहिल्यादांच 150 फुट बाय 80 फुटचा एल. सी. डी. स्टेजवर वापरला जाणार आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे गानकोकीळा लता मंगशकर आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहणार आहे. एवढंच नाही तर या कार्यक्रमात हरिहरन आणि साधना सरगम यांच्यासह अनेक कलाकार गाणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम पुणेकरांसाठी खास गाण्यांची मेजवानी ठरणार आहे.

close