जाहिरातींमध्ये बदल करा, निवडणूक आयोगाचे काँग्रेसला निर्देश

October 5, 2014 9:27 AM0 commentsViews: 2678

8cm prithviraj chavan

05 ऑक्टोबर :  सध्या टीव्हीवर झळकणार्‍या काँग्रेसच्या जाहीरातीमुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दक्षिण कराडचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण चांगलेचं अडचणीत आले असून मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाची काँग्रेसला दिली आहे.

या जाहिरातीत काँग्रेसनं केलेल्या कामांची माहिती सांगून काँग्रेसलाच मतदान करण्याचं आवाहन करताना पृथ्वीराज चव्हाण दिसत होते. त्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते एका कागदावर सही करतानाही या जाहिरातीत दिसत होते. या जाहिरातीमधल्या ‘मुख्यमंत्री’ या शब्दावर औरंगाबाद इथल्या जिज्ञासा प्रतिष्ठाननं आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची ही जाहिरात मतदारांची फसवणूक करत असल्याचं या तक्रारीत म्हटलं गेलं होतं. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने या जाहिरातीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close