बातम्यांमध्ये झळकण्यासाठीच राष्ट्रवादीवर टीका – सुप्रिया सुळे

October 5, 2014 10:10 AM0 commentsViews: 1189

supriya-sule05 ऑक्टोबर :  शरद पवारांवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली नाही तर हेडलाईन होतं नाही त्यामुळेचं बाजारात जे विकतं आणि पिकतं त्याच्यावरचं टीका होते, असं प्रत्युत्तर खासदार सुप्रिया सुळेंनी मोदींना दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीडमधल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी हा भ्रष्टाचारवादी पक्ष असल्याची टीका केली होती.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, सगळेचं पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करत आहेत. काही पक्षांच्या नेत्यांचं तर ध्येय राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणं हेच आहे . हेचं त्यांचं विकासाचं धोरण आहे. पवारांवर टीका करणं हेचं त्यांचं धोरण आहे. त्यांच्याकडे बाकी बोलण्यासारखं काहीच नसल्यानं ते राष्ट्रवादीवर टीका करतात, असा टोला ही त्यांनी विरोधकांना लगावला.

सगळे पक्ष राष्ट्रवादीच्या टीकेवर चालतात, महायुती आणि आघाडी तुटीला शरद पवार जबाबदार आहेत अशीही टीका त्यांच्यावर होत आहे. जर का आमचा माणूस चार-पाच पक्ष चालवत असेल तर त्यांना त्याचं क्रेडीट दिले पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close