पूँछमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

October 5, 2014 12:52 PM0 commentsViews: 337

pakistan ceasefire voilation

05 ऑक्टोबर :    जम्मू आणि काश्मीरमधल्या पूँछमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात 1 गावकरी ठार झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

सीमेवरच्या भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून आज पहाटे जोरदार गोळीबार करण्यात आला. यामुळे सीमाभागातल्या गावांमध्ये दहशती पसरली आहे. पाकिस्तानी सैन्याने उखळी तोफांचा मारा केला असून त्यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं आहे. हा गोळीबार बराच वेळ सुरू होता. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close