महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

October 5, 2014 3:26 PM0 commentsViews: 1094

uddhav thackray

05 ऑक्टोबर : विदर्भ विकासापासून कोसो दूर असून अजूनही प्रत्येक घरात साधी वीजही पोहोचू शकलेली नाही, असं म्हणत आम्ही विदर्भाचा विकास करू मात्र महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होऊ देणार नाही असं मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्ध्यामधल्या सभेत व्यक्त केलं आहे. भारताचा तुकडा पाकिस्तानकडून कधी परत आणणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे. ते आज विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या आज (रविवारी) चंद्रपूर, भंडारा, नागपूर इथंही सभा होणार आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचं त्यांनी भाजपला ही लक्ष्य केलं आहे. जाहिरातीत शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागणार्‍यांनी कधी तरी शिव जयंती साजरी केली आहे का? असा सवाल विचारत त्यांनी अमित शहांच्या सभेतही शिवाजी महाराजांना विसरले होते अशी टीका केली आहे. तर महाराष्ट्र माझा म्हणणार्‍यांनी फक्त घोटाळे केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी जनतेसमोर शिवसेनेचं व्हिजन मांडत मुलांच्या पाठीवरचं ओझं दूर करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना टॅबलेट देणार आहोत. तसंच नागपूरला ‘ट्रान्सपोर्ट हब’ करणार असून महाराष्ट्राला भारनियमनमुक्त करणार असल्याचं ही त्यांनी आश्वासन दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close