तहरीक-ए-तालिबानने स्वीकारली लाहोर बॉम्बस्फोटाची जबाबदारी

May 28, 2009 4:27 AM0 commentsViews: 2

28 मे पाकिस्तानातल्या तालिबानी संघटनेने काल बुधवारी झालेल्या लाहोर हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. तहरिक-ए-तालिबान पंजाब या असं या संघटनेचं नाव आहे. तुर्की जिहादी वेबसाईटवर तुर्की भाषेत एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय. स्वातमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईला बळी पडत असलेल्या तालिबान्यांना ही भेट असल्याचं त्यात म्हटलं आहे. बुधवारी झालेलया या शक्तिशाली आत्मघातकी हल्ल्यात 35 जण ठार, तर जवळपास 400 जण जखमी झालेत. दरम्यान या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांना सोडण्यात आलं.

close