मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे ? -राज ठाकरे

October 5, 2014 9:36 PM5 commentsViews: 3115

109raj_on_modi05 ऑक्टोबर : पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी बदलतील असं वाटलं होतं पण ते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसारखंच वागतायत. गुजरातचा उदो उदो करत असतील तर ते चालणार नाही मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे की गुजरातचे ? असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. राज्यातील सगळे प्रकल्प गुजरातला नेले जात आहे असा आरोपही राज यांनी केला. राज ठाकरे मुंबईत बोलत होते.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नातं सर्वश्रूत आहे. राज ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून कित्येक वेळा मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. पण विधानसभेच्या आखाड्यात उलट चित्रं पाहण्यास मिळत आहे. राज ठाकरेंनी आता थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. मुंबईतील भाडुंप मतदारसंघात मनसेची भव्य सभा पार पडली. यासभेत राज ठाकरेंनी चौफेर तोफ डागली. नरेंद्र मोदींची बीडमध्ये सभा झाली आणि म्हणे गोपीनाथ मुंडे असते तर मला येण्याची गरज पडली नसती. मोदींनी असं सांगून इथल्या भाजपच्या नेत्यांना कमी लेखून त्यांची जागाच दाखवून दिली. भाजपच्या होर्डिंगवर सुद्धा या नेत्यांची फोटो नाही. यांचे फोटो पाहून यांना मतं तरी मिळतील का ? असा सवाल करत राज यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलाच टोला लगावला.

आता घाटकोपरमध्ये ‘हे राम’

स्वबळाची भाषा बोलणार्‍या भाजपने 52 उमेदवार आयात केले. हे कसलं स्वबळ आहे. जे आयात केले तेच उभे केले. स्वतःच्या बळावर उमेदवार निवडून आणता येत नाही. अनेक ठिकाणी तर आमचेच उमेदवार आमच्या विरोधात उभे केले. घाटकोपरमध्ये ‘आमचं हे’ असा एकेरी उल्लेख करत आता फक्त ‘हे राम’च होईल असं सांगत राज यांनी राम कदमांना फटकारून काढलं.

पंतप्रधान मोदी देशाचे की गुजरातचे ?

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर तरी बदलतील असं वाटलं होतं पण फक्त गुजरात एके गुजरातचं सुरू आहे. अलीकडे ते अमेरिकेचा दौर्‍यावर जाऊन आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी ‘केम छो’ असं म्हणून स्वागत केलं. केम छो का ? जर मराठी पंतप्रधान असते तर काय कसं चाललं असं विचारलं असतं का ? जर ओबामांनी केम छो म्हणत स्वागत केलं होतं तर मोदींनी हिंदीतून बोलणं अपेक्षित होतं पण मोदींनी तसं केलं नाही. देशाचा पंतप्रधान कोणत्याही राज्याचा असावा पण आपल्या देशाचा अभिमान पहिला दिसला पाहिजे. पण मोदी जिकडे तिकडे गुजरातचे गुणगाणं गात आहे. जपानच्या दौर्‍यावरही तसंच झालं. जपान दौर्‍यावर अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा केली. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनची गरज काय ? लवकर जाऊन काय तिथे ढोकळा खायचा. का मुंबईतून कोणत्या मराठी माणसाला अहमदाबादेत जायचंय. यावरून मोदींचं गुजरात प्रेम दिसून येत असून मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

टोलवर विरोधकांनी आंदोलन का केलं नाही?

राज्यात किती टोल आहे, ते कसे चालतात, किती पैसा येतो याचं काहीही घेणंदेणं नाही. हा सगळा पैसा या सत्ताधार्‍यांच्या खिश्यात जातो. मनसेनं यासाठीच टोलवर आंदोलन केलं. शांततेनं ही केलं आणि आपल्या स्टाईलनेही केलं. जर आम्ही विरोधी पक्षात आहोत तर मग शिवसेना आणि भाजप का नाही उतरली रस्त्यावर ? हे विरोधी पक्ष नाहीत का ? एकनाथ खडसेंना फोन केला होता असं सांगत राज यांनी खडसेंची मिमिक्री करून दाखवली आणि त्यांनी पुढच्यावेळी आंदोलन करून असं सांगितलं होतं असा खुलासा राज यांनी केला. मनसेच्या आंदोलनांमुळेच 44 टोल बंद पडले असंही राज म्हणाले.

राज ठाकरेंच्या भांडुपमधील सभेतील ठळक मुद्दे

यंदा महाराष्ट्रात वेगळे चित्र असेल
महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्षांची गरज नाही
महाराष्ट्राला स्वातंत्र्य नकोय तर स्वायत्तता हवी
चारही पक्षांना लोक नाकारतील – राज
भाजपच्या प्रत्येक होर्डिंगवर मोदी मग इथल्या नेत्यांचं काय झालं ?
मोदी म्हणाले गोपीनाथ मुंडे असते तर मला येण्याची गरज नव्हती, आता त्यांनीच इथल्या नेत्यांचा कमीपणा दाखवला
राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल – राज
भाजपचे उमेदवार आयात केलेले – राज
बाळासाहेबांमुळे भाजपला बळ – राज
घाटकोपरमध्ये आता फक्त ‘हे राम’, राज ठाकरेंनी राम कदमांना फटकारलं
पंतप्रधान झाल्यावर तरी बदलतील असं वाटलं होतं पण फक्त गुजरात…गुजरात – राज
ओबामा म्हणे केम छो…मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे? राज ठाकरेंचा सवाल
देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी चालतील पण गुजरातचा उदो उदो चालणार नाही – राज
बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद कशाला ?, मुंबई ते दिल्ली का नाही ? लवकर जाऊन काय तिथे ढोकळा खायचा ? -राज ठाकरे
एअर इंडियाचं ऑफिस गुजरातला हलवण्याचं ठरलं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण का बोलले नाही ? का गप्प बसले ? -राज ठाकरे
पंतप्रधान झाल्यावर मोदी बदलतील वाटलं पण ते गुजरातच्या मुख्यमंत्री सारखंच वागताय -राज ठाकरे
टोलसाठी आंदोलन केलं होतं ते कुणासाठी केलं होतं. तेव्हा कुठे होते हे विरोधी पक्ष ? -राज ठाकरे
टोलवर किती खर्च होतो, किती पैसे जमा झाले हे कुणाला माहिती नाही-राज ठाकरे
सगळा पैसा सत्ताधार्‍यांना पोहचतो-राज ठाकरे
मनसेनं आंदोलन केलं म्हणून 44 टोल बंद झाले -राज ठाकरे
शिवसेना,भाजपने टोलसाठी का आंदोलन केलं नाही ? -राज ठाकरे
कोल्हापुरात जनतेनं आंदोलन केलं कुणी श्रेय लाटू नये, राज ठाकरेंचा सेनेला टोला
नाशिकमध्ये आयुक्त दिला नाही, फाईली रखडून ठेवल्या गेल्या, मग विकास कसा होणार ? -राज ठाकरे
नाशिकच्या गोदापार्कसाठी अंबानी, रतन टाटांशी चर्चा केली सगळ्यांना कामासाठी तयारी दाखवली पण हे काम रखडून ठेवलं -राज
पर्यटन विषयावर 12 लाख तरुणांना नोकर्‍या देऊ शकतो -राज

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • bhavya

  Is he fighting against Modi whom he admired till a few months back or does he want to fight against the corruption of Congress-NCP who have ruined Maharashtra in the last 15 years?

  • vijesh

   maharastra bjp have no face to project in these electionb..shame for bjp
   ..now for corporaration election bjp may call modi for rally….total stupidness….

   • bhavya

    If they dont have a face means they wont run a good efficient and development oriented government? What logic is that..let them make anyone CM..if modi is at the centre and the CM has good coordinatiin with him Maharashtra will progress..

 • Kadam

  Earlier there was Dada Kondke for Comedy in Shivsena but Raj Thakre no need anybody. Obama Speaking in English or Gujrati that is his choice

 • Balasaheb

  SP, BSP AAP kept silent on corrupt
  congress who was in power and targeted Modi in Loksabha polls, result was clean
  swipe for BJP… Sena , MNS targeting Modi but are silent on corrupt congress
  govt in power…will BJP benefit this time also ??

close