कोणाकोणाला मिळाली कोणकोणती खाती ?

May 29, 2009 8:24 AM0 commentsViews: 13

29 मे शपथविधीनंतर अनेकांची उत्सुकता लागून राहिलेले खातेवाटप पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी बैठक घेऊन जाहीर केलं. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात यावेळी यंग बिग्रेडचा भरणा आहे. पण या टीमचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे टीममध्ये घराणेशाहीचाही बोलबाला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या टीममध्ये देशातल्या सगळ्यात मोठ्या गांधीघराण्याचा एकही सदस्य नाही. पण अनेक राजकारण्यांचे नातेवाईक या टीममध्ये आहेत. डीएमकेचे करुणानिधी यांचा मुलगा अझागिरी आणि नातू दयानिधी मारनह्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश आहे. तसंच पी.ए. संगमा यांची मुलगी अगाथा संगमा यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे. यंदाच्या अपारंपरिक उर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री फारुक अब्दुल्ला यांच्यासाठी तर दोनो हात घीमे और सीर कढाईमे स्थिती आहे. कारण त्यांच्यासहित त्यांचा जावई जावई सचिन पायलट यांनाही मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं आहे.केंद्रीय मंत्री आणि त्यांची खाती पंतप्रधान – डॉ. मनमोहन सिंग कॅबिनेट मंत्री प्रणव मुखर्जी – अर्थ खातं शरद पवार – कृषी, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ए.के.अँटनी – संरक्षण पी.चिदंबरम् – गृह ममता बॅनर्जी – रेल्वे गुलामनबी आझद – आरोग्य आणि कुटुंब कल्याण सुशीलकुमार शिंदे – उर्जा विरप्पा मोईली – विधी व न्याय जयपाल रेड्डी – नगरविकास, कमलनाथ – महमार्ग आणि रस्ते वाहतुक वायलर रवी – अनिवासी भारतीय मीरा कुमार – जलसंसाधनमुरली देवरा – पेट्रोलियम व नैसर्गिक वायू कपिल सिब्बल – मनुष्यबळ विकास अंबिका सोनी – माहिती व प्रसारणबी.के. हाडिक – खाण आणि ईशान्य राज्ये विकास आनंद शर्मा – उद्योग व वाणिज्य सी.पी.जोशी – ग्रामीण विकास व पंचायत राज वीरभद्र सिंह – पोलाद फारुक अब्दुल्ला – अपारंपरिक उर्जा विलासराव देशमुख – अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम जी.के. वासन – जलवाहतूक मुकूल वासनिक – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण पवनकुमार सिब्बल – संसदीय कामकाज दयानिधी मारन – वस्त्रोद्योग ए.राजा – माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मल्लिकार्जुन खरगे – कामगार व रोजगार ए.के.अझागिरी – खते व रसायन कुमारी शैलजा – पर्यटन, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मुलन सुबोधकांत सहाय – अन्नप्रक्रिया उद्योग डॉ. एम.एस. गिल – क्रीडा व युवक कल्याण कांतीलाल भुरिया – आदिवासी कामकाज स्वतंत्र खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रफुल्ल पटेल – नागरी उड्डाण पृथ्वीराज चव्हाण – विज्ञान व तंत्रज्ञान, पंतप्रधानांचे कार्यालय, कार्मिक, संसदीय कामकाजसलमान खुर्शीद – कंपनी व्यवहार, अल्पसंख्यांक कामकाज जयराम रमेश – वन व पर्यावरण श्रीप्रकाश जयस्वाल – कोळसा, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणीदिनशा पटेल – लघु व उद्योगकृष्णा तीरथ – महिला व बालकल्याण केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत – माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार ज्योतिरादित्य शिंदे – उद्योग आाणि वाणिज्य व्ही. नारायण स्वामी – नियोजन आणि संसदीय कामकाज श्रीकांत जेना – खते आणि रसायने मुलपल्ली रामचंद्रन – गृह डी. पुरंदेश्वरी देवी – मनुष्यबळ विकास पनबक्का लक्ष्मी – वस्त्रोद्योग अजय माकन – गृह के.एच. मुनिअप्पा – रेल्वे नमो नारायण मीना – अर्थ जितीन प्रसाद – पेट्रोलियम व नैसर्गिक वायू ए. साईप्रताप – पोलाद एम.एम. पल्लम राजू – संरक्षण महादेव खंडेला – महामार्ग आणि रस्ते वाहतूक हरीश रावत – कामगार आणि रोजगार प्रा. के.व्ही. थॉमस – कृषी, अन्न व नागरीपुरवठा, ग्राहकसंरक्षण परनीत कौर – परराष्ट्र सचिन पायलट – माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार शशी थरूर – परराष्ट्र भरतसिंग सोळंकी – उर्जा तुषार चौधरी – आदिवासी कामकाज अरुण यादव – क्रीडा व युवक कल्याण प्रतीक पाटील – अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम आर.पी.एन.सिंग – महामार्ग आणि रस्ते वाहतुक व्हिन्सेंट पाला – जलसंसाधन प्रदीप जैन – ग्रामीण विकास ई. अहमद – रेल्वे सुगाता राय – नगरविकास दिनेश त्रिवेदी – आरोग्य व कुटुंब कल्याण शिशीर अधिकारी – ग्रामीण विकास सुलतान अहमद – पर्यटन मुकुल रॉय – जल वाहतूक मोहन जतुआ – माहिती व प्रसारण एस.एस. पलानीमणिक – अर्थ डी. नेपोलियन – सामाजिक न्याय व सक्षमीकरण डॉ. एस. जगतरक्षकन – माहिती व प्रसारणएस. गांधी सेल्वन – आरोग्य व कुटुंबकल्याण अगाथा संगमा – ग्रामीण विकास

close