चव्हाण हे सोनियांच्या कृपेमुळे राज्याला दत्तकपुत्र लाभले -गडकरी

October 6, 2014 8:23 PM0 commentsViews: 622

06 ऑक्टोबर : राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सोनिया गांधींच्या कृपेनं राज्याला दत्तकपुत्र लाभले अशी जळजळीत टीका भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी केली. आज कराड इथं झालेल्या सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण मतदार संघात उभे आहेत, त्यामुळे गडकरी आज कराडच्या सभेत नेमकं काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे गडकरी यांनी आपल्या भाषणात मुख्यंमत्र्यांवर सडकून टीका केली. राज्याचे मुख्यमंत्री हे निष्क्रीय आहेत आणि मुख्यमंत्र्यांची गाडी भंगार झाली अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले. तसंच मुख्यमंत्र्याचा पराभव झाल्यानंतर मला खूप आनंद होईल असंही गडकरी म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close