रेखासाठी जीवनगौरव पुरस्काराचं नाव बदलण्यास विरोध

May 29, 2009 9:41 AM0 commentsViews: 5

29 मे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चित्रपट अभिनेत्यांना देण्यात येणारा राजकपूर जीवनगौरव पुरस्काराचं नाव बदलायला मनसेने विरोध केला आहे. मनसेने विरोधामुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांचा विरोध नोंदवला आहे. रेखासाठी पुरस्काराचं नाव बदलल्यास,पुण्यात होणारा सोहळा उधळून लावू असा इशारा मनसेने या पत्रातून दिला आहे. तर दुसरी कडे मराठी कलाकारांनीही नाव बदण्याला विरोध केला आहे. रेखा वयाने वाढली पण त्यांची अक्कल वाढली नाही अशी टीका ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी केली आहे. राज्यसरकारकडून देण्यात येणारा,राजकपूर जीवन गौरव पुरस्कार यावर्षी अभिनेत्री रेखाला जाहीर झालाय. पण रेखाने जीवनगौरव या शब्दाला आक्षेप घेतल्याने सरकारने या पुरस्काराचं नाव राजकपूर प्रतिभागौरव पुरस्कार केलं. नेमकासरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे. तर आता शिवसेनेनेही याचा विरोध केला आहे. रेखानं माफी मागावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. तर पुरस्काराच्या नावात बदल केला नाही, असा दावा राज्यसरकारनं केला आहे. याबाबतचे सगळे निर्णय तज्ञांच्या समितीनं घेतले असल्यानं त्याला विरोध करण्याचं काम नाही असंही सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे.

close