आयोगाने बजावली गडकरींना कारणे दाखवा नोटीस

October 6, 2014 11:20 PM0 commentsViews: 1679

044513nitin_gadkari06 ऑक्टोबर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना निवडणूक आयोगाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. येत्या बुधवारी म्हणजे 8 तारखेला संध्याकाळपर्यंत नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

लातूरच्या निलंगा येथील सभेत ‘ जे पक्ष पैसे वाटतात त्यांच्याकडून पैसे घ्या पण महाराष्ट्राचा विकास करणार्‍यांनाच मतदान करा’ असं वादग्रस्त वक्तव्य गडकरींनी केलं होतं. त्यांच्या वादग्रस्त विधानाची दखल घेत आयोगाने गडकरींना नोटीस बजावली आहे. या सभेत गडकरी एवढ्यावरच थांबले नाही, गरिबांच्या हाती याच काळात पैसा मिळतो, चांगलंचुंगलं खायला मिळतं तर त्यांनी ही संधी सोडू नये असंही गडकरी म्हणाले होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close