प्रचाराचा ‘हटके’ फंडा,एसटीत प्रचाराची ‘टींग टींग’ !

October 6, 2014 11:52 PM0 commentsViews: 631

06 ऑक्टोबर : ना धुराळा उडविणार्‍या गाड्यांचा ताफा…ना फटाक्यांची आतषबाजी…ना कार्यकर्त्यांचा गराडा ना घोषणाबाजी … असाच काहीसा हटके प्रचाराचा फंडा अवलंबलाय सोलापुरातल्या एका अवलिया उमेदवारानं…या उमेदवाराचं नावं आहे सुभाष देशमुख..कधी एसटीतून तर कधी गाव बाजारात फिरत…पारावर मिळेल ती भाकरी खाणारे हे आहेत माजी खासदार सुभाष देशमुख…

सुभाष देशमुख हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष..त्यांना लोक बापू म्हणून ओळखतात. आता हे बापू सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढताहेत. येथे त्यांची प्रमुख लढत ही काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप मानेंशी आहे. मानेकडं सोलापुरातील आर्थिक सत्तेची केंद्र आहेत..म्हणजे डीसीसी,एपीएमसी,स्वत:च्या बँका,शिक्षण संस्था. अशी सारी यंत्रणा सध्या काँग्रेसच्या प्रचारासाठी दिलीप मानेंच्या दिमतीला आहे. त्यामुळे त्यांची प्रचार यंत्रणा सक्षमपणे लोकांपर्यत पोहचते आहे. त्यांच्या या प्रचारयंत्रणेला तोंड देण्यासाठीच बापूंनी थेट मतदाराकडंचं मतांचं दान मागायचं ठरवलंय अन् तेही प्रचाराचे वेग-वेगळे फंडे वापरून…त्यासाठी बघा काय-काय करताहेत सोलापूरचे हे सुभाष बापू…सुभाषबापू महागड्या एसी गाड्यासोडून सरकारच्या एसटीत बसून लोकांशी संवाद साधत आहेत. तर सहप्रवाशी मतदारांना मी सुभाष देशमुख आहे…मी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवित असल्याची माहिती सांगत आहेत…हे सांगून झालं…की सर्वांना नमस्कार करत पुन्हा दुसरी बस पकडतात अन् पुन्हा तिच मतांची मागणी करतात…हेही कमी म्हणून की काय…बापूंनी आपल्या मतदारसंघातल्या आठवडी बाजार असलेल्या गावांची लिस्ट काढलीय अन् या लिस्टनुसार गावा-गावातल्या आठवडी बाजारात जावून ते मतदारांना आपल्यालाच मत देण्याचं अवाहन करताहेत..बरं हे झालं प्रचाराचं या अशा भटक्याप्रचारादरम्यान पोटाचं काय ? त्याचीही नामी शक्कल शोधून काढलीय सुभाषबापूंनी….काय तर ज्या गावात जातात…तिथल्याच कार्यकत्यांच्या घरातल्या चुलीवर तयार झालेली भाकरी भाजी हातावर घेवून खातात….ती अशी…मग कांदा आला..कच्च्या भाज्या आल्या..पण त्याहून महत्वाचं म्हणजे लोकमताचा अंदाज बांधण्याचं काम सुभाष देशमुख करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close