योगिता ठाकरे मृत्यू प्रकरणाची सुनावणी 2 जूनला

May 29, 2009 10:13 AM0 commentsViews: 48

29 मे, नागपूर योगिता ठाकरे या नागपूरमधल्या बालिकेच्या मृत्यू प्रकरणाची प्रकरणाची सुनावणी दोन जूनपर्यंत होणार आहे. आज या प्रकरणाची सुनावणी होती. पण सुनावणीला उत्तर देण्यासाठी राज्यसरकारने अजून चार दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे सुनावणी 2 जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा राज्यसरकारने निर्णय घेतला आहे. योगिता ठाकरे या नागपूरमधील सात वर्षांच्या बालिकेच्या मृत्यू प्रकरणाच्या केसची आज हायकोर्टात सुनावणी होती. भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कारमध्ये योगिताचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. आधी अपघाती मृत्यू म्हणून पोलिसांनी याची नोंद केली होती, पण नंतर जनमताचा रेटा पाहून, अखेर गुन्हा नोंदवून घेण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर 26 मेला कोर्टाने राज्य सरकारला 2 दिवसात उत्तर द्यावं, अशी नोटीस बजावली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत राज्य सरकार काय उत्तर देतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.योगिता ठाकरे या सात वर्षीय बालिकेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयात 26 मे ला सुनवाई झाली. आणि राज्य सरकारने 2 दिवसांत उत्तर द्यावं अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावरच आज उच्च न्यायालयात सुनवाई होती.

close