असेही उमेदवार, मागत आहेत एक-एक रुपया !

October 6, 2014 11:57 PM0 commentsViews: 1001

06 ऑक्टोबर : निवडणुकीच्या काळात लाखो रुपयांची उधळपट्टी हे काही नवीन नाही. एकेका मताला 500 ते 5000 पर्यंत भाव आलेला असतो. अशात जुन्नरमधले अपक्ष उमेदवार मनोज छाजेड यांनी वेगळीच वाट निवडली आहे. आपल्या खिशातला रुपयाही खर्च न करता मतदारांकडून 1-1 रुपया जमा करत आहेत. विशेष म्हणजे छाजेड यांना निवडणुकीचा कुठलाही अनुभव नाही. तरीही त्यांनी थेट विधानसभा लढण्याची तयारी केलीय. आतापर्यंत 24 हजार लोकांनी 2 लाख 45 हजार रुपयांची मदत छाजेड यांना दिली आहे. तेव्हा आपला विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.आपण निवडणूक ‘जिंकू किवा हरू ‘ पण जमा केलेली रक्कम मात्र मतदारसंघातील कामासाठीच वापरणार, असा छाजेड यांचा निर्धार आहे.”मी उमेदवार, तुम्ही आमदार” हे त्यांच्या प्रचाराचे लक्षवेधी आवाहन सगळ्यांचे लक्ष वेधत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close