चिपळूणजवळ मालगाडीचे 10 डबे घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प

October 7, 2014 8:33 AM1 commentViews: 536

07 ऑक्टोबर :  कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे ठप्प झाली आहे. चिपळूणच्या खेर्डी पुलाजवळ मालगाडीचे 10 डबे घसरल्याने हा अपघात झाला असून कोकण रेल्वे पुन्हा खोळंबली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी किमान 24 तास लागणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • sagar bandarkar

    paha kuthe nehun thevalay maharashtra maza

close