पैसे वाटपावरुन राडा, पाचपूते- जगतापांविरोधात गुन्हा दाखल

October 7, 2014 11:23 AM0 commentsViews: 1026

shreegondia

07 ऑक्टोबर : श्रीगोंद्यात पैसे वाटप प्रकरणी भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे नेते कुंडलिकराव जगताप समर्थकांमध्ये मोठा राडा झाला. या प्रकरणी बबनराव पाचपूते आणि कुंडलिकराव जगताप यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सरकारी कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी तसेच बेकायदा जमाव जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्यासाठी त्यांचे वडील कुंडलिकराव जगताप हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत पैसे वाटत असल्याचा आरोप पाचपुते यांनी काल केला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून यानंतर सबंधित बंँक सील करण्यात आली आहे.

दरम्यान दोन्ही गटांचे समर्थक समोरासमोर आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा जमाव पांगवण्यासाठी पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close