शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही – मोदी

October 7, 2014 1:55 PM3 commentsViews: 3824

modi 5 sep speech
07 ऑक्टोबर :   जोपर्यंत मी दिल्लीत सत्तेवर आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईशिवाय महाराष्ट्र अपूर्ण असून देशाला पुढे नेण्याची ताकद फक्त महाराष्ट्रात असल्याचंही मोदी म्हटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धुळ्यातल्या दोंडाईचा इथे आज (मंगळवारी) झालेल्या सभेत ते बोलत होते.

मोदींनी आजच्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेतून केली. भाजपची सत्ता आल्यास राज्याचे तुकडे पडतील अशी भीती जवळपास सर्व पक्षांना वाटू लागल्याचं सांगत, त्यांना उत्तर देताना मोदी म्हणाले, निवडणुकीचा जोर चढू लागताच काही मंडळी वाटेल ते बोलू लागलेत. दिल्लीत सत्तेवर असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. पण यावेळी स्वतंत्र विदर्भाविषयी भूमिका जाहीर करणं त्यांनी टाळले आहे.

मोदींनी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देत काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला आहे. 15 वर्षांत महाराष्ट्रात 2 पिढ्या बरबाद केल्या, घोटाळे केले, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे. तसचं मी गरिबीत वाढलो आहे त्यामुळे गरिबांचं दु:ख मी जाणतो, त्यासाठी झोपडीत जाऊन फोटो काढण्याची मला गरज नाही, असा टोला मोदींनी नाव न घेता राहुल गांधींना लगावला आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग याच एका विषयावर काँग्रेसने गेल्या अनेक निवडणुका लढवल्या. पंचायतीपासून संसदेपर्यंत सगळीकडे त्यांचेच राज्य होते. पण तरीही एका इंचाचीही प्रगती झाली नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली आहे. कापूस व कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्यांन विरोधात 15 ऑक्टोबररोजी मतदान करून 15 ऑक्टोबरला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा उत्सव साजरा करा असं आवाहन मोदींनी मतदारांना केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • vidyanand

  विकास ,विकास म्हणजे नेमक काय?

  विकासाचा अर्थ बुलेट ट्रेन,उंच इमारती,मॉल, पौश रस्ते , मोठे हॉटेल्स हा आहे का?

  मुळीच नाही भारतासाठी तरी हा अर्थ होऊ शकत नाही

  आणि हा सर्व विकास कोठे तर मेट्रो सिटी मधे

  ज्या भारतात आज पण अन्न, पाणी आणि निवारा ह्या मूलभूत गरजा पण पूर्ण

  नाहीत त्यात असा विकासाने काय साध्या होईल आणि कुणाच्या फायद्याचा असेल

  हा विकास !

  ज्या भारतात गरीब आणि श्रीमन्तात मधली दरी दिवसें दिवस वाढत आहे

  ज्या भारतात आजही गरीब माणसाचा टर्न ओवर हा श्रीमंत माणसाच्या कुत्र्या वर

  होणार्‍या खर्चा पेकाशा कमी असतो

  त्या गरिबना ह्या विकासाच काय ?

  देवाने जन्माला दिल तेवा सर्वाना सारख केल ना?

  गरीब श्रीमत हे तर आपण बनवल ,

  सर्वजण हुशार असतात पण सर्वजण चतुर नसतात

  या विकासाने पोस्टमन,ड्राइवर,पोलीस,घरकाम करणारे, मजूर,कामगार,शेतकरी

  आणि यासारखे कितीतरी यांचा फायदा होईल
  ?

  धन दांडगे लोकच ह्यातल्या सुख सुविधा घेऊ शकतील

  आता धन दांडगे कोण?

  वाटेल त्या भावात विकणारे व्यापारी, दलाल,करप्टेड गोवेरमेण्ट कर्मचारी

  आणि राजकीय पुढारी

  विकासाचा खरा अर्थ गरीब गरजू लोकाना अन्न,वस्त्रा ,निवारा,पाणी,लाइट,रोड,आणि

  शिक्षण,रोजगार मिळावा असा असावा

 • vidyanand

  स्वच्छ ता ही फक्त दिखवा ठरू नये त्यासाठी प्रोग्राम आणि टार्गेट असावे

  तसाच झाडे लावण्यासाठी पण फक्त शो बाजी नसावी

  टार्गेट आणि प्रोग्राम असावा.

  बीजेपी चा विकास हा धन दांडगे चा विकास वाटतो

  बीजेपी चा स्वछॅ भारताचा अजेंडा हा फक्त अड्वरटाइज़ सारखा वाटतो

  बीजेपी वर्चुयल वर्ल्ड मधे सगळ्याना घेऊन जात आहे

  म्हाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी केलेले त्यांचे आटोकाट प्रयन्त

  मग शिवाजी महाराजांचा पूलका असो , की रेकॉर्ड ब्रेक इतक्या सभा, की

  प्रतेक वेबसाइट वर खालून आणि वरुन अलगd येणारा मोदिन्च चेहरा असो

  खूप वाईट वाटते की विकासावर लढणारी बीजेपी आज शिवाजी महाराज मधे आणून लढते

  वाईट वाटते की पाण्यासारखा पैसा ओतते

  वाईट वाटते की ज्याना कल्न्कित करप्टेड म्हणायचे त्यांच्या 40 ते 50 शिटस आहेत

  बीजेपी राष्ट्रवादी झाली अस वाटते

  एक हाती सत्ता कशाला महाराष्ट्राचे निर्णय हवे तसे घायला

  बीजेपीची प्रतिमा खूप मलिन वाटते म्हणून च कदाचित सघाने साथ सोडली वाटते

  मुंबई ,महाराष्ट्राला काबीज करण्याचे बीजेपी (मोदी, शहा) यांचे स्वप्न साकार होऊ देऊ नका

 • vidyanand

  मित्र हो,

  युती जागा वाटपा मुळे तुटली
  अस जरी वाटत असल तरी युती ठेवायची नाही हे अगोदरच फिक्स होत, त्याची खालील कारणे
  आहेत

  १ मोदी हे हुशार आणी
  महतवाकांशी नेते आहेत

  २ देशाच भल ते करतील या बाबत
  शंका नाही

  ३ मी ५ वर्ष गुजरात मधे राहत
  होतो २००४ ते २०१० याकाळात मी मोदीची खूप भाषण एकलित

  ४ गुजरात बद्दल त्याना फार
  अभिमान आहे ,ते शहाजिक आहे

  ५ पण ज्या ज्या वेळी गुजरात
  बद्दलचा त्यांचा अभिमान पुढे आला त्यावेळेस त्यानी महाराष्ट्र आम्हाला काही दिले
  नवह्ते याची आठवण ते करून देतात

  ६ गुजरात हा महाराष्ट्रा
  पेक्षा मोठा व्हावा , मुंबई गुजरातची असावी किंवा मुंबई अहमदाबाद ला शिफ्ट करावी (
  म्हणजे बिज़्नेस) या करिता त्यानी खूप प्रयत्न केले

  ७ आज महाराष्ट्रात बीजेपी ची
  एक हाती सत्ता यावी आणि महाराष्ट्र किंवा मुंबई आपल्या ताब्यात यावी ही त्यांची
  ईछा आहे

  ८ महाराष्ट्राच वर्चस्व हे
  खूप लोकाना खुपते त्या पैकी मोदी एक आहेत

  ९ महाराष्ट्राचे तुकडे
  करायचे आणि महाराष्ट्राचा आवाज कमी करायचा असे खूप लोकांचे स्वप्ना आहे

  १० विदर्भ वेगळा कुणाला हवा
  आणि कशासाठी हे मला मी विदर्भचा असून पण कळले नाही

  ११ मत कुणाला पण द्या पण
  बीजेपी ला एक हाती सत्ता देणे हे कदाचित महाराष्ट्राच्या भल्याचे नाही

close