आईच्या भेटीचं मार्केटिंग का करता ? पवारांचा मोदींना सवाल

October 7, 2014 4:32 PM0 commentsViews: 2875

ajit pawar ncpe07 ऑक्टोबर : लोकांना चॅनेलबाजी करण्याची सवय आहे. निव्वळ स्वत:काही करतो त्याचं मार्केटिंग करायचंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईला घराच्या बाहेर घेऊन भेट घेतात आणि सगळ्या मीडियाला दाखवतात. आईच्या भेटीचं पब्लिसिटी का करता ? मीही माझ्या आईला भेटतो पण असं कधी करत नाही असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. ते बीडमध्ये बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी आपल्या आईला भेटायला अहमदाबादमध्ये जात असता. मोदी आणि त्यांच्या आईंच्या भेटीवर अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. काही लोकांना मीडियाची सवय झालीये. निव्वळ स्वत:काही करतो त्याचं मार्केटिंग करायचंय. माझीही आई काटेवाडीला राहते. 75 वर्ष वय आहे तिचं. मी मुंबईला असतो आणि पाच वेळा निवडून आलोय. कधीकधी बारामतीला आल्यावर आईला भेटतो. तब्येतीची विचारपूस करतो. ती पण माझी विचारपूस करते. पण मी काटेवाडीत माझ्या घरी गेल्यावर घराबाहेर दोन खुर्च्या टाकत नाही आणि मीडियाला बोलवतं नाही. कॅमेर्‍यावाल्यांना बोलवत नाही. सगळ्या भारताला दाखवत नाही की, किती आईची विचारपूस चालू आहे हे सगळं कोण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी करता असता. अरे तुम्ही आईला भेटायचं तर घरात भेटाना दरवाज्याच्या बाहेर येऊन पब्लिसिटी करण्याचं काय काम आहे असा टोला अजित पवारांनी लगावला. आता तुम्ही पब्लिक फिगर आहात तुमच्या पत्नीबद्दल काय उत्तर आहे. तुम्हाला कुणीविचारला तर काय सांगाल हीच का तुमची महिलाबद्दलची आस्था आहे. याबद्दल त्यांनी उत्तर दिलं पाहिजे अशी टीकाही पवारांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close