महाराष्ट्र तोडण्यासाठी शिवरायांचा आशीर्वाद हवाय का ?-उद्धव

October 7, 2014 5:54 PM9 commentsViews: 1919

uddhav beed sabha07 ऑक्टोबर : एकीकडे मोदी म्हणता महाराष्ट्र तोडणार नाही तर दुसरीकडे यांच्याच पक्षाचे गडकरी आणि फडणवीस विदर्भ तोडण्याची भाषा करत आहे. शिवरायांचा आशीर्वाद यासाठीच पाहिजे का ? महाराष्ट्र तोडू पाहणार्‍यांना तुम्ही मत देणार का ? असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. तसंच गोपीनाथ मुंडेंना भाजपमध्ये खूप सहन करावं लागलं, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. ते बीडमध्ये बोलत होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे. आज बीडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.मी भाजप विरोधात बोलणारच. एका बाजूला महाराष्ट्र तोडणारे भाजपवाले बसले आहे आणि धुळ्यात मोदी म्हणतात, मी जोपर्यंत पंतप्रधानपदावर आहे तोपर्यंत महाराष्ट्र तुटू देणार नाही. त्यांचं म्हणणं मानलं. पण दुसरीकडे 10 मिनिटांच्या आता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये म्हणतात मोदी मुंबईबद्दल बोलले होते. आम्ही विदर्भ वेगळा करणार म्हणजे करणारच, महाराष्ट्र तोडणारच ही एकीकडे लुटालूट आणि तोडणार्‍यांची टोळी बसलेली आहे त्यांना मतदान करणार का ? शिवरायांचा आशीर्वाद पाहिजे यांना महाराष्ट्र तोडण्यासाठी आशीर्वाद पाहिजे का ? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे केवळ भाजपचे नेते नव्हते तर ते लोकनेते होते. सगळे मित्र लोकसभेला होते आता ते सगळे पळाले. गोपीनाथ मुंडे असते तर यायची गरज नव्हती. जागावाटप करत असताना मुंडे प्रेमाने जागा वाढवून मागायचे आणि बाळासाहेब देखील जागा वाढवून द्यायचे अशी आठवण उद्धव यांनी काढली. तसंच मुंडेंच्या मृत्यूची मी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ऑक्टोबर आला तरी अजून चौकशीचा पत्ता नाही. मुंडे होते तेव्हा त्यांना खूप सहन करावं लागलं. आता त्यांच्याबद्दल इतरांना खूप पुळका आलाय असं सांगत उद्धव यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावल्

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  भाजप बद्दल एवढा तिव्र संताप आहे तर मग शेवटपर्यंत युती टिकवण्याचा प्रयत्न का केला?

 • Sham Dhumal

  मनाचे डायलॉग वापरुन जनतेला फसविण्याचे दिवस साता संपले आहेत.

 • Sham Dhumal

  उध्दव ठाकरेंनी टीकेचे लक्ष्य भाजप ला केले आहे. तर आतापर्यंत १५ वर्षे त्यांच्याशी युती का केली? आता भ्राष्टाचारी नेत्यांना विसरुन का गेले?

 • Sham Dhumal

  जनतेचा कौल न बघताच मुख्यमंत्री शिवसेनेचाच असे म्हणतात. शिवसेनेला जनमतांचा आदर ठेवावा असे वाटत नाही का?

 • hemant

  bhajap mhanaje garaj saro ani vaidya maro. 50 – 50 loksabhela ka nahi magitale

 • Ajay

  Udhav forget real problem in Maharashtra and start virtual emotional, Why not is talking about NCP Irrigation Scam, adarsh scam and lot of..

 • Ajay

  I think, Udhav was bad dreaming last night, So he is speaking something unrealistic. Walk-up Udhav.

 • abbas

  mr Udhat aap koun? kya bol rahe ho ? kiske barame? thoda tamij se bat karo.. Wo MP ka Dogi sing bhi accha bolata hai.. isaka bhi Pappu ho gaya

 • Ghanshyam

  yuti Tutli hi Sevsena Aani Bajpache durdavy Aahe Aani Janta Yuti sakakar pasun Vanchit Rahu Shakte.

close