शपथविधीनंतर मंत्री झाले कामावर रूजू

May 29, 2009 1:20 PM0 commentsViews: 3

29 मे शपथविधीनंतर विलासराव देशमुख, कपिल सिब्बल, मुरली देवरा, शशी थरुर, कमलनाथ, आनंद शर्मा या मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा आज कार्यभार स्वीकारला. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्याबरोबर राज्यमंत्री प्रतीक पाटीलही उपस्थित होते. आपल्याला विलासराव देशमुख यांच्या हाताखाली खूप काही शिकायला मिळेल, असं प्रतिक पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी पुन्हा एकदा पेट्रोलियम खात्याचा पदभार स्वीकारला. गॅस उत्पादनांवरील टॅक्स कमी केले जातील असे संकेत त्यांनी दिलेत. ऑईल डिरेग्युलेशनबाबत सरकार विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. कच्चं तेल आणि गॅसचं अतिरिक्त उत्पादन वाढलं आहे. ही देशासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. या उत्पादनातला 25 टक्के वाटा केर्न एनर्जीच्या बारामार जिल्ह्यातल्या प्लान्टमधून मिळणार आहे. कच्चं तेल आणि गॅसचं उत्पादन वाढलं तर एक्सप्लोरेशन खात्यावरचा भार कमी होईल आणि याचा अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असंही ते म्हणाले. माजी वाणिज्यमंत्री कमलनाथ यांना नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात रस्ते,परिवहनआणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय देण्यात आलंय. पूर्वीप्रमाणेच या नव्या खात्याची जबाबदारीदेखील आपण यशस्वीरित्या पेलू असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आनंद शर्मा यांनीदेखील आज त्यांच्या खात्याचा कारभार ताब्यात घेतलाय. जागतिक मंदीमुळे उद्योगांमध्ये औद्योगिक मालाची मागणी आटत आलीय, तिला उत्तेजन देण्यासाठी उपाययोजना करू असं त्यांनी सांगितलं.

close