स्वबळावर लढण्याच्या मागणीचा विलसरावांनी केला पुनरुच्चार

May 29, 2009 1:34 PM0 commentsViews: 1

29 मे लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर काँग्रेसने महाराष्ट्रातही स्वबळावर लढावं या मागणीचा विलासराव देशमुख यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतरही पुनरुच्चार केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने उत्तरप्रदेशात चांगली आघाडी घेतली. हाच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरणार का, असं नवे कॅबिनेट मंत्री विलासराव देशमुखांना विचारलं तेव्हा त्यांनी तसं उत्तर दिलं. राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात काँग्रेसला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे आता हा आता 'युपी फॉर्म्युला'च झाला आहे. महाराष्ट्रात तो वापरायचा की नाही हे हायकमांड ठरवेल, असंही शरद पवार म्हणाले.

close