वेगळ्या विदर्भाची भूमिका कालही आणि आजही -जावडेकर

October 7, 2014 11:05 PM5 commentsViews: 1661

prakash javadekar07 ऑक्टोबर : वेगळा विदर्भ ही आमची भूमिका कालही होती आणि आजही आहे. शिवसेनेचा काय मुद्दा आहे हा त्यांचा विषय आहे असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व्यक्त केलं. आम्हीची प्रतिबंधता जनतेशी असून महाराष्ट्र राज्य काँग्रेस -राष्ट्रवादी मुक्त करायचंय हे आमचं लक्ष्य आहे असंही जावडेकर म्हणाले. ते पालघरमध्ये बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापतोय. विदर्भ वेगळा करण्याचा भाजपचा डाव आहे, असा पुनरुच्चार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे तुकडे करणार नाही अशी ग्वाही देत आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते विदर्भ वेगळा करण्याची आश्वासन देतं आहे. यासाठी तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद हवाय का ? असा संतप्त सवालही उद्धव यांनी केला.

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आज पालघरमध्ये प्रचार सभेसाठी आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जावडेकरांनी वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. वेगळा विदर्भ ही आमची भूमिका कालही होती आणि आजही आहे. .आमची विदर्भाविषयीची भूमिका पहिली जी होती ती आताही कायम आहे. शिवसेनेचा काय मुद्दा आहे हा त्यांचा विषय आहे. जेव्हा आम्ही युतीत होतो तेव्हा त्यांची भूमिका वेगळी होती तरीही आमचा संसार सुखाचा झाला असंही स्पष्टीकरण जावडेकरांनी दिलं. तसंच आमची प्रतिबंधता ही महाराष्ट्राशी आहे. आताच मुद्दा जनतेशी प्रतिबंधतेचा आहे. जनतेला चांगलं राज्य देणं या जुलमी राज्यातून त्यांची मुक्तता करणे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करणे आणि आमचं सध्याचं राज्य कालबद्धीतने ते अंमलात आणणे हे आमचं उद्दिष्ट आहे असं जावडेकरांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Think

  Jai Vidarbha!!!

 • aamadmi

  हे खरं असेल तर , मोदिजींनी शाब्दिक खेळ करण्यापेक्षा सरळ सरळ भूमिका मांडावी. का घाबरत आहेत ?

 • anil rajge

  हे शक्य नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून to महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव कदापी शक्य नाही. तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास मोठे आंदोलन पेटेल.

 • Pandharinath more

  भा ज पा चे काही उल्लू बनविंग उदाहरणे

  १. लोकसभेत जर जागा कमी पडल्या तर राष्ट्रवादी कडून मदत घेयाची तयारी होती मात्र आत्ता त्यांना राष्ट्रवादी हि भ्रस्ताचार्वादी वाटू लागली

  २. आज पर्यंत शिवसेनेनी केलेल्या टीका त्यांना लागत न्हावत्या पण लोकसभेत पूर्ण बहुमत येताच त्या त्यांना टोचू लागल्या

  ३. सीमेवर पाकिस्तान कडून गोळीबार होत असताना पंतप्रधानाला महाराष्ट्र जिंकण्यामध्ये रस

  ४. पंतप्रधानाला देशा पेक्षा जास्त काळजी पक्ष्याची

  ५. जे त्यांना विकास पुरुष आहे अस समजून देशाचे नेतृत्व देण्या साठी दिवस रात्र एक केली त्यांना संपवून स्वताचे अस्तित्व स्थापन करण्याची तयारी

  ६. रास्त्रपती राजवट आल्यानंतर सत्ता हि केंद्राच्या हातात जाते तर मग भा ज पा ची सत्ता आल्यानंतर हि ती केंद्राच्या हातातच जाणार आहे जर भा ज पा लाच मतदान करायचे तर मग मतदान कशासाठी राहू दे न रास्त्रपती राजवट च थोडे मोदी विषयी

  मोदी हे एक चतुरस्त गुजराती जे देश्वशियाच्या भावानासी खेळण्यात आणी स्वताला एक महापुर्षा सारखे दाखवण्यात महारत हासील असलेले व्यक्तिमत्व

  ते फक्त आपल्या वक्त्रत्वा ने माणसाची माने जिंकून देशाला आपल्या वश मध्ये करतात आणि सर्वत्र आपले सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्नात आहेत ते पंतप्रधान होताच अडवाणी , मुर्लीमान्हार जोशी , जसवंत सिंग जे आपल्या रस्त्यात येवू शकतील अस्याना बाजूला सारल आणि अमित शहाच्या हातात

  भा ज पा चे अध्यक्ष पद देवून भा ज पा वरती आपली पकड मजबूत केली

  आत्ता ते शिवसेनेला हटवून महारष्ट्रातील सत्तेसाठी

  ज्या पक्षांनी विकास आणि हिंदुत्व असल्यामुळे सत्तेची कुठे च लाभ न्हवता अशा वेळी साथ दिली त्यांना सातेत येताच संपवण्याचा प्रयत करतात काय ते तुम्हाला वाटत आमचे उपकार लक्षात ठेवतील

  थोडासा अंदाज माज्याकडून

  भा ज पा ला जर जागा कमी पडल्या तर शिवसेनेला मदत करण्यास भाग पाडतील नाही मदत दिली तर त्यांना केंद्रातून बाहेर करतील. भा ज पा संपूर्ण बहुमत मिळाले तर ते शिवसेनेला असेच बाहेर करतील

  महाराष्ट्रात भा ज पा ची जर सता येत नसेल तर ते राष्ट्रपती राजवट लावतील व सता केंद्राच्या हातात घेतील एवढे सर्व कशा साठी तर देश्याच्या उत्पांच्या ४०% उत्पन महाराष्ट्रातून मिळते

  मोदिजी कुठे नेहून ठेवण्याचा विचार करताय महाराष्ट्राला माझ्या k

 • मराठी माणूस

  भाजपने ५५ उमेदवार राष्ट्रवादी , कोन्ग्रेस आणि शिवसेना मनसे कडून भाडे तत्वावर आणले आहेत आणि त्यांच्या जोरावर हे सर्व बकवास विधाने करत आहेत हे

close