ग्राऊंड रिपोर्ट : कुठे नेऊन ठेवलाय विक्रमगड माझा !

October 7, 2014 10:08 PM0 commentsViews: 407

विजय राऊत, विक्रमगड

07 ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी जमातीसाठी राखीव आहे. इथला जवळपास 83 टक्के समाज हा आदिवासी आहे. आजही इथल्या अनेक समस्या जैसे थेच आहेत. एकीकडे भाजपच्या ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीचा सोशल मीडिया आणि व्हॉटसऍपवर खिल्ली उडवली जात आहे मात्र कुठे नेऊन ठेवला विक्रमगड माझा अशी म्हणण्याची वेळ विक्रमगडांच्या रहिवाशांवर आलीये. त्याबद्दलचा हा ग्राऊंड रिपोर्ट…

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मतदारसंघ..या मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, कुपोषण यासारख्या अनेक समस्या आहेत. अनेक वर्षांपासून असलेल्या या समस्या आजही जैसे थेच आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं याच भागात आहेत. तरीही इथले रहिवासी वर्षांनुवर्षं तहानलेले आहेत. 2009मध्ये या मतदारसंघानं भाजप आणि राष्ट्रवादीची लढत पाहिली. पण यावेळी खरी लढत आहे शिवसेना आणि भाजपमध्ये.

पण, स्थानिक आमदारांनी या भागाचा नाही तर ठेकेदारांचा विकास केलाय, अशी टीका शिवसेनेचे उमेदवार प्रकाश निकम यांनी केलीये.
मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या जव्हार मतदारसंघातही पर्यटनदृष्ट्या काहीही विकास झालेला दिसत नाही. तेव्हा इथला मतदार कुणाला मत देतो हे पाहावं लागेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close