देशाच्या आर्थिक विकासाला मिळणार वेग

May 29, 2009 1:46 PM0 commentsViews: 2

29 मे देशाच्या आर्थिक विकासाला पुन्हा वेग मिळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. चौथ्या तिमाहीमध्ये जीडीपी दरामध्ये वाढ झालेली दिसत आहे. आकडेवारीनुसार, जीडीपीचा म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाचा दर 5.8 टक्के इतका झाला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत या दरात वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीत हा दर 5.3 टक्के होता. पण मागच्या वर्षी हा दर 8.6 टक्के होता. 2008 – 2009 या चालू आर्थिक वर्षात,आर्थिक विकासाचा दराचं लक्ष्य 6.7 टक्के आहे. मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरच्या विकासाचा दर मायनस 1.4 टक्के इतका झाला आहे. कृषी क्षेत्राचा दर 2.7 टक्के तर कन्स्ट्रक्शन सेक्टरचा दर 6.8 टक्के इतका झाला आहे.

close