विधानसभा निवडणुकीतही ‘नमो’ X ‘रागा’

October 8, 2014 11:51 AM1 commentViews: 1002

rahul vs modi54q
08 ऑक्टोबर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नमो विरुद्ध रागा असं युद्ध आता विधानसभेतही रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही आजपासून राज्यात प्रचाराला सुरुवात करणार आहेत. राहुल गांधी यांच्या आज महाष्ट्रात दोन जाहीर सभा होणार आहेत.

रायगड जिल्ह्यातल्या महाड आणि लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये राहुल गांधींची सभा होणार आहेत. महाडच्या परांजपे हायस्कूल मैदानात राहुल गांधी दुपारी 12 वाजता आणि दुपारी सव्वातीन वाजता लातूरच्या औसामध्ये सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी याआधीच भाजपच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यात मोदींच्या आत्तापर्यंत 12 सभा झाल्या आहेत.

दुसरीकडे उद्धव ठाकरे आज कोकण दौरा करणार आहेत. भाजपचे नेते अमित शहा उत्तर महाराष्ट्रात, तर सुषमा स्वराज यांच्याही राज्यात दोन सभा होणार आहे. शरद पवार मुरबाडमध्ये तर अजित पवार यवतमाळमध्ये सभा घेणार आहेत.

आज राज्यात प्रचार शिगेला

 • राहुल गांधी – दुपारी साडे बारा वाजता महाडमध्ये सभा आणि साडे तीन वाजता औसा, लातूरमध्ये सभा
 • उद्धव ठाकरे – कोकण दौरा – आजच्या दिवसात 3 सभा – वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरी
 • राज ठाकरे – भिवंडी आणि ठाणे
 • अमित शहा – नंदुरबार, धुळे आणि चाळीसगाव
 • सुषमा स्वराज – मिरज आणि सांगली
 • पंकजा मुंडेंच्या आज चार सभा आहेत. दौंड, बारामतीतलं माळेगाव, सातारा आणि पुणे शहरात एक सभा.
 • एकनाथ खडसे – नंदुरबार जिल्ह्यातलं शहादा आणि धुळे जिल्ह्यातलं शिरपूर
 • देवेंद्र फडणवीस – आज तीन सभा – वाई, कोल्हापूर जिल्ह्यातलं उचगाव आणि पुणे
 • शरद पवार – मुरबाड
 • अजित पवार – यवतमाळ
 • सुप्रिया सुळे – जुन्नर आणि हडपसर

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Pandharinath more

  भा ज पा चे काही उल्लू बनविंग उदाहरणे

  १. लोकसभेत जर जागा कमी पडल्या तर राष्ट्रवादी कडून मदत घेयाची तयारी होती मात्र आत्ता त्यांना राष्ट्रवादी हि भ्रस्ताचार्वादी वाटू लागली

  २. आज पर्यंत शिवसेनेनी केलेल्या टीका त्यांना लागत न्हावत्या पण लोकसभेत पूर्ण बहुमत येताच त्या त्यांना टोचू लागल्या

  ३. सीमेवर पाकिस्तान कडून गोळीबार होत असताना पंतप्रधानाला महाराष्ट्र जिंकण्यामध्ये रस

  ४. पंतप्रधानाला देशा पेक्षा जास्त काळजी पक्ष्याची

  ५. जे त्यांना विकास पुरुष आहे अस समजून देशाचे नेतृत्व देण्या साठी दिवस रात्र एक केली त्यांना संपवून स्वताचे अस्तित्व स्थापन करण्याची तयारी

  ६. रास्त्रपती राजवट आल्यानंतर सत्ता हि केंद्राच्या हातात जाते तर मग भा ज पा ची सत्ता आल्यानंतर हि ती केंद्राच्या हातातच जाणार आहे जर भा ज पा लाच मतदान करायचे तर मग मतदान कशासाठी राहू दे न रास्त्रपती राजवट च थोडे मोदी विषयी

  मोदी हे एक चतुरस्त गुजराती जे देश्वशियाच्या भावानासी खेळण्यात आणी स्वताला एक महापुर्षा सारखे दाखवण्यात महारत हासील असलेले व्यक्तिमत्व

  ते फक्त आपल्या वक्त्रत्वा ने माणसाची माने जिंकून देशाला आपल्या वश मध्ये करतात आणि सर्वत्र आपले सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्नात आहेत ते पंतप्रधान होताच अडवाणी , मुर्लीमान्हार जोशी , जसवंत सिंग जे आपल्या रस्त्यात येवू शकतील अस्याना बाजूला सारल आणि अमित शहाच्या हातात

  भा ज पा चे अध्यक्ष पद देवून भा ज पा वरती आपली पकड मजबूत केली

  आत्ता ते शिवसेनेला हटवून महारष्ट्रातील सत्तेसाठी

  ज्या पक्षांनी विकास आणि हिंदुत्व असल्यामुळे सत्तेची कुठे च लाभ न्हवता अशा वेळी साथ दिली त्यांना सातेत येताच संपवण्याचा प्रयत करतात काय ते तुम्हाला वाटत आमचे उपकार लक्षात ठेवतील

  थोडासा अंदाज माज्याकडून

  भा ज पा ला जर जागा कमी पडल्या तर शिवसेनेला मदत करण्यास भाग पाडतील नाही मदत दिली तर त्यांना केंद्रातून बाहेर करतील. भा ज पा संपूर्ण बहुमत मिळाले तर ते शिवसेनेला असेच बाहेर करतील

  महाराष्ट्रात भा ज पा ची जर सता येत नसेल तर ते राष्ट्रपती राजवट लावतील व सता केंद्राच्या हातात घेतील एवढे सर्व कशा साठी तर देश्याच्या उत्पांच्या ४०% उत्पन महाराष्ट्रातून मिळते

  मोदिजी कुठे नेहून ठेवण्याचा विचार करताय महाराष्ट्राला माझ्या

close