टाट इलेक्टोरल ट्रस्टनं केली ममता बॅनर्जी यांना मदत ?

May 29, 2009 1:56 PM0 commentsViews: 1

29 मे केंद्रात पुन्हा एकदा महत्त्वाचं स्थान मिळवणा-या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला चक्क टाटांनीच आर्थिक मदत देऊ केली होती हे ऐकून आश्चर्य वाटेल. तृणमूल काँग्रेसला टाटा इलेक्टोरल ट्रस्टनं दोन दिवसांपूर्वी 27 लाखांचा चेक दिल्याचं पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. पण त्याचबरोबर आपल्या पक्षानं हा चेक परत पाठवून दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. टाटा ग्रुपच्या प्रवक्त्यानंही या बातमीला दुजोरा दिला. लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या सहभागावर ही रक्कम ठरवण्यात येऊन चेक तृणमूल काँग्रेसला पाठवण्यात आल्याचं टाटा ग्रुपच्या प्रवक्त्यानं सांगितलं. टाटांच्या पश्चिम बंगालमधल्या सिंगूर इथल्या नॅनो प्रकल्पाला तृणमूल काँग्रेसचा विरोध अजूनही कायम असतानाच अशा प्रकारचा चेक पक्षाला खुद्द टाटा इलेक्टोरल ट्रस्टकडून गेल्याबद्दल चर्चा सुरू आहे.

close