नौसेनेच्या कार्यक्रमात कॅप्टन सचिन तेंडुलकर !

October 8, 2014 4:30 PM0 commentsViews:

sachin tendulkar

08 ऑक्टोबर : भारतीय नौसेना बुधवारी 82 वा ‘एअरफोर्स डे’ साजरा करत आहे. गाझियाबादच्या हिंदोन एअरफोर्स बेसवर यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांचं विशेष आकर्षण ठरलं ते हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इंडियन एअरफोर्सचा कॅप्टन म्हणून कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळेस त्याने चार वर्षांपूर्वीचं एअरफोर्सने सचिनला कॅप्टन पद बहाल करून गौरवलं होतं. एअरफोर्सशी संबंध नसताना हा सन्मान मिळवणारा सचिन हा पहिलाचं खेळाडू आहे. या कार्यक्रमात सचिन आपल्या पत्नी अंजलीसह सहभागी झाला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close