अनिल अंबानींनीही घेतला हातात झाडू

October 8, 2014 3:31 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी देशातील 9 प्रसिद्ध सेलिब्रिटींना स्वच्छतेचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला सेलिब्रिटींनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सचिन तोंडुलकरनं हे आवाहन स्वीकारल्यानंतर आता उद्योगपती अनिल अंबानी आज पहाटे चर्चगेट स्टेशनजवळ हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. यावेळी अनिल अंबानी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्यांनी आणखी 9 सेलिब्रिटींची नावं घोषित केली. या 9 जणांमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन, शोभा डे, प्रसून जोशी, हृतिक रोशन, शेखर गुप्ता, सानिया मिर्झा, मेरी कोम, तेलुगु सुपरस्टार नागार्जुन यांचा समावेश आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याची संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया अनिल अंबानी यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close