‘मोदींनी जवानाचं शीर नाही पण शरिफांना आणलं’

October 8, 2014 3:56 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर : शहीद झालेल्या जवानांचे शिर पाकिस्तानातून आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होतं, पण शीर नाही यानी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आणले अशा शब्दात माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मोदींवर टीका केली. पाकिस्तानला जाब विचारण्याची हिंमत सरकारने दाखवली नाही, या शासनाने देशाच्या सुरक्षेबाबत खेळ मांडलाय असा आरोपही आर.आर.पाटील यांनी केला. ते नांदेडमध्ये बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यावर सीमारेषेवर शहीद झालेल्या जवानाचे शीर परत आणणार असं आश्वासन दिलं होतं. भाजप संपूर्ण बहुमताने सत्तेवर विराजमान झालं आणि मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांना बोलावले होते. नवाझ शरिफ यांच्या या उपस्थितीचा आर.आर.पाटलांनी समाचार घेत मोदींना टोला लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close