‘कॉमेडी नाईट्स’मध्ये रेखाची धमाल

October 8, 2014 9:36 PM0 commentsViews:

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रेखा या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपील’मध्ये पोहचल्या. यावेळी रेखाने शोमध्ये खूप धमाल केली. रेखा आपल्या आगामी ‘सुपर नानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये पोहोचल्या होत्या. कपील शर्माने यावेळी रेखा सोबत खूप मस्तीही केली. ‘सुपर नानी’ मध्ये रेखाच्या नवर्‍याचा रोल प्ले करणारे रणधीर कपूरही यावेळी आले होते, तसेच चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्टही बिट्टू शर्माच्या घरात उपस्थित होती. अनारकलीच्या रूपात आलेल्या कपील शर्माच्या पत्नीने रेखाच्या जुन्या आठवणींना उजाळाही दिला. एकंदरीतच कॉमेडी नाईट्सचा हा एपिसोड मजा-मस्ती-धमाल ने भरलेला असल्याने प्रेक्षकंासाठी एक वेगळाच आनंद देऊन जाणारा आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close