ग्राऊंड रिपोर्ट : जो काम करेल त्यालाच मत, डोंबिवलीकरांचा पवित्रा !

October 8, 2014 11:27 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात यावेळी रंगतदार सामना पहायला मिळणार आहे. पण दररोज अनेक समस्या झेलणार्‍या डोंबिवलीकरांच्या या समस्या कोण दूर करणार असे प्रश्नं मतदार विचारत आहेत. त्यामुळे जो आमच्या समस्या दूर करेल त्यालाच आम्ही निवडून देऊ असं मत डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत. डोंबिवलीचा हा खास ग्राऊंड रिपोर्ट…

डोंबिवली शहराच्या रेल्वेस्टेशन बाहेर पडल्यावर सामना होतो तो वाहतूक कोंडीचा, दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या बिल्डिंगचा, नियमांचे सर्रास होणार्‍या उल्लंघनांचा आणि त्यामुळे नागरीकांच्या सोयी-सुविधांवर होणार्‍या परिणामांचा. याच प्रमुख समस्यांवर डोंबिवलीकर निवडणुकीत प्रश्नं उपस्थित करत आहेत.

यावेळी डोंबिवलीत खरा सामना शिवसेना, मनसे आणि भाजप यांच्यातच होणार आहे. भाजपचे विद्यामान आमदार रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीकरांसाठी विकास अजेंडा घेऊन आले आहेत.

‘सांस्कृतीक शहर, सुशिक्षितांचे शहर…!’ ही ओळख बाजुला सारून ‘बजबजपुरी’चे शहर अशी ओळख डोंबिवलीची बनू नये, यासाठी जो लोकप्रतिनिधी काम करेल, त्यालाच आम्ही मत देऊ, असा निर्धार डोंबिवलीकरांनी केलेला दिसतोय.

डोंबिवली भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो, या मतदारसंघावर कोणाचा झेंडा फडकणार हे येत्या 19ऑक्टोबरला स्पष्ट
होईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close