राज्यात आज स्टार प्रचारकांचा धूमधडाका

October 9, 2014 9:17 AM0 commentsViews:

star politican banner copy

09 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आज (गुरुवारी) राज्यात तीन आणि दोन सभा होणार आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेतेही ठिकठिकाणी सभा घेणार असल्याने आज राज्यात प्रचाराचा धूमधडाका उडेल.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या सोनिया गांधी पहिल्यांदाच प्रचारासाठी राज्यात येणार आहे. त्यांच्या औरंगाबाद आणि कोल्हापूर इथे सभा होणार आहेत. तर मोदी बारामती, राहूरी आणि मुंबईत सभा घेतील. शरद पवार यांच्या सिंदखेडराजा, बीड, धुळे येथे तर अजित पवार यांच्या पुणे परिसरात पाच सभा होतील. उद्धव ठाकरे आज पुणे दौर्‍यावर आहेत. तर राज ठाकरे यांच्या मुंबईत दोन ठिकाणी सभा होणार आहेत.

दरम्यान, जवळपास सर्वच पक्षांनी मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यामुळे मोदी यांच्याविरोधात सोनिया गांधी काय बोलणार, याची काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

आजच्या प्रचार सभा: 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज चार सभा होतायेत. सर्वात आधी मोदी शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणजेचं बारामतीत सभा घेणार आहेत. त्यानंतर राहुरी, पिंपरी आणि शेवटी मुंबईतल्या सायनमध्ये त्यांची सभा होणार आहे.
  • सोनिया गांधी – काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आज दोन सभा होणार आहेत. कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये सोनिया बोलतील. यावेळी त्या मोदी आणि शरद पवारांवर काय बोलतात, याबाबत उत्सुकता आहे.
  • उद्धव ठाकरे – उद्धव ठाकरे आज पुणे दौर्‍यावर आहेत. जुन्नर, मंचर, चाकण, भोसरी, चिंचवड आणि शेवटी पुण्यातलं एसपी कॉलेज, इथे त्यांच्या सभा होतील. तर आदित्य ठाकरेही अनेक ठिकाणी रोड शो करणार आहेत.
  • राज ठाकरे – राज ठाकरे मुंबईमधल्या मुलुंड आणि भांडुप भागांमध्ये सभा घेतील
  • शरद पवार- सिंदखेडराजा (बुलडाणा), परळी- वैजनाथ(बीड),धुळे
  • अजित पवार- पुणे जिल्हा दौरा, सकाळी वाघोली, कामशेत, दुपारी- मुळशी- घोटवडे, वेल्हा, संध्याकाळी- हडपसरला रोड शो, रात्री- शिवाजीनगरला सभा
  • सुप्रिया सुळे- सकाळी- मुरूड(लातूर),बार्शी (सोलापूर), दुपारी- करमाळा (सोलापूर)
  • अमित शहा- विदर्भ दौरा, सकाळी- वर्ध्याच्या पुलगावमध्ये, दुपारी- चंद्रपूर- राजुरा, यवतमाळ, संध्याकाळी- अमरावती
  • मायावती- पुणे दौरा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close