परभणीत सापडलेली रोकड पक्षाची – अजित पवार

October 9, 2014 10:55 AM0 commentsViews:

Ajit pawar

09 ऑक्टोबर : निवडणुकीच्या काळात राज्यात पैशांचा पाऊस पडतं आहे. गेल्या काही दिवसांत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी ठिकठिकाणहून लाखो-करोडोंची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या गाडीतून काल (बुधवारी) 3 बॅगांमध्ये 4 लाख 80 हजारांची रोख रक्कम सापडली होती. विशेष म्हणजे या बॅगा राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएच्या आहेत. पण हे पैसे पक्षाचेचं असल्याचं अजित पवारांनी लातूरमधल्या निलंगा इथं स्पष्ट केलं आहे. प्रचारासाठी 13 तारखेपर्यंतचा खर्च म्हणून पक्षाच्या खात्यातून 8 लाख रुपये काढले त्यापैकी 3 लाख खर्च केले आहेत. उर्वरित रक्कम परभणीहून लातूरला आणण्यात येत होती. हवामान खराब असल्यानं बॅग हेलिकॉप्टरमध्ये ठेवता आल्या नाहीत. यासंबधी सर्व माहिती पोलिसांना दिलेली आहे, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे.

दरम्यान, पंढरपूरमध्ये एक कोटीची रोख रक्कम सापडली आहे. पंढरपुरातल्या तीन रस्ता चौकात टाटा इंडिका गाडीसह 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर बुलडाण्यात 80 लाखांची रक्कम सापडली. बुलडाण्याच्या भोकरवाडीजवळ ही रक्कम सापडली आहे.

आतापर्यंत पोलिसांनी जप्त केलेली रक्कम

धुळे :

 • 36 लाख 50 हजारांची रोकड जप्त
 • साक्री-नंदुरबार मार्गावर रोकड जप्त
 • एक आरोपी ताब्यात

भांडुप :

 • 25 लाखांची रोकड जप्त
 • भांडुपच्या LBS रोडवर रोकड जप्त
 • तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

पंढरपूर

 • 40 लाख

धुळे 

 • 11 लाख जप्त

पंढरपूर 

 • 1 कोटी रुपयांची रोकड जप्त
 • तीन रस्ता चौकात मारुती कारमध्ये सापडली रक्कम
 • 3 जण ताब्यात, गाडी जप्त

विरार

 • 3 लाख 20 हजारांची रोकड पकडली.
 • कन्हेर फाट्याजवळ निवडणूक भरारी पथकाची कारवाई

बुलडाणा

 •  80 लाखांची रोकड
 • 2 जणांवर कारवाई

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close