प्रचाराची अनोखी शक्कल, पंकजा मुंडेंनी केलं फोनवरून भाषण!

October 9, 2014 12:55 PM0 commentsViews:

pankaja munde on fone

09  ऑक्टोबर :  सध्याच्या प्रचारामध्ये टेक्नॉलॉजी महत्त्वाची भूमिका बजावतेय. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा वापर केला जातोच आहे पण याच टेक्नॉलॉजीचा काल एक वेगळाच फायदा भाजपच्या आमदार पंकजा मुंडेंना झाला. भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांची काल सातार्‍यात सभा होती. पण, खराब वातावरणामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला टेक ऑफची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्या सभेला जाऊ शकल्या नाही. मग, त्यांनी अनोखी शक्कल लढवत फोनवरून सभेला संबोधित केलं. पंकजा मुंडेंनी महादेव जानकरांना फोन केला. जानकरांनी फोन लाऊडस्पीकर मोडवर टाकत माईक समोर धरला, आणि जमलेल्या मतदारांसोबत पंकजा मुंडेंनी संवाद साधला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close