‘फेसबुकचा’ निर्माता मोदींच्या भेटीला

October 9, 2014 3:22 PM0 commentsViews:

modi and zhuk09 ऑक्टोबर : संपूर्ण जगाला फेसबुकचे वेड लावणारा, फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्ग हा आज भारतात येणार आहे. आज आणि उद्या दिल्लीत होणार्‍या पहिल्या internet.org समिटमध्ये मार्क झुकरबर्गचं भाषणही होणार आहे. मार्क झुकरबर्ग हा नरेंद्र मोदी व इतर मंत्र्यांचीही भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं काही दिवसांपूर्वीच अमेरिका दौरा करून भारतात परतले. सर्वच तरूणांना फेसबुक सारख्या अनोख्या जगाची भुरळ पाडणारे ‘सोशल मीडियाचे हिरो’ भारतात येणार असल्याने तरुण उत्सुक आहेतच त्याचबरोबर मार्क झुकरबर्गच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींही उत्सुक आहेत. याआधी ‘ऍमेझॉनच्या’ जेफ बेझोस आणि ‘मायक्रोसॉफ्टच्या’ सत्या नाडेल यंानी भारतात येऊन मोदींंची भेट घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेणारा मार्क झुकरबर्ग हा तिसरा अमेरिकेतील हाय प्रोफाईल सीईओ आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close