काका-पुतण्यांच्या राजकारणातून बारामतीला मुक्त करा -मोदी

October 9, 2014 10:56 PM0 commentsViews:

modi in jnpt09 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यात तीन सभा घेतल्या. राहुरी, बारामती आणि मुंबईत घाटकोपरमध्ये भव्य सभा पार पडल्यात. बारामतीत झालेल्या सभेत काका-पुतण्यांच्या राजकारणातून बारामतीला मुक्त करा, देश स्वतंत्र झाला पण बारामती अजूनही गुलामगिरीत आहे अशी नरेंद्र मोदी यांनी केली.

सीमेवर हिंसाचार सुरू असताना पंतप्रधान महाराष्ट्रात सभा घेतायत या टिकेला त्यांनी उत्तर दिलं. सीमेवर जवान सडेतोड उत्तर देतायत. त्याचं राजकारण करू नका, असं आवाहन मोदींनी केलं. शरद पवार संरक्षण मंत्री असताना सीमेवर हिंसाचार होत नव्हता का ? असा सवाल त्यांनी केला आणि दहशतवादाचं राजकारण करू नका, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत द्या, असं आवाहन केलं.

दरम्यान, बारामतीत पाणीप्रश्नावरून नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली होती. त्याला पवारांनी ट्विटरवरून उत्तर दिलंय. मोदींनी बारामतीच्या पाण्याची चिंता कऱण्यापेक्षा गुजरातच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा मी गेली पन्नास वर्ष विकासाचं राजकारण केलं. आम्ही सगळ्या समाजघटकांना सोबत घेतलं असं पवारांनी ठणकावून सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close