भाजपला शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार कुणी दिला- पवार

October 10, 2014 9:10 AM12 commentsViews:

sharad pawar 15th

10 ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करुन शिवरायांच्या आशीर्वाद मागणार्‍या भाजपने गुजरातच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवून महाराजांचा अपमान केला असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. त्याच बरोबर अशा लोकांना शिवछत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार रेखा खेडेकर यांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते.

गुजरातमध्ये शालेय पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती देण्यात आली. शिवाजी महाराजांची जन्मतारीख चुकली. यात भर म्हणजे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे आजोबा असल्याचे म्हटले आहे. हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही असेही त्यांनी खडसावले.

पाकिस्तानच्या हल्ल्याबाबतही त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. पाकिस्तान देशातील सीमेवर गोळीबार करत आहे. सीमेजवळच्या गावातील रहिवासी स्थलांतरित होत असताना आमचे पंतप्रधान सभा घेण्यात व्यस्त आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  लोकसभा निवडणुकीच्या वेळी अशाचप्रकारे अनेक नेते सतत मोदींच्या विरोधात अतिशय तीव्र स्वरुपात टीका करत होते. जनता निवडुन देते याचेही त्यांना भान नव्हते. खोटे आरोप करून जनतेला आपण सहज फसवू शकतो असा त्यांचा समज आहे.

 • Sham Dhumal

  इंग्रजानी जाती धर्म भाषा व प्रांतवादाचे विष पेरले आहे. अजुनही कांहीजण हीच नीती वापरतात. जनतेने लोकसभेला त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

 • Sham Dhumal

  भ्रष्टाचारात १ नंबर नको आहे.

 • Sham Dhumal

  अनुदान मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या घरात, शेतकरी आत्महत्त्या करणे यामध्ये महाराष्ट्र १ नंबर नको आहे.

 • Sham Dhumal

  भ्रष्टाचारी लोकांनी शिवाजी महाराजांचे नाव घेणे योग्य आहे का?

 • Sham Dhumal

  भ्रष्टाचारी लोकांनी स्वत:ला सेक्यूलर जाहीर करुन जाती धर्माचे राजकारण करणार्‍यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेणे योग्य आहे का?

  • bhaurao

   ncp mdil bhrshr manse bjp la kase chaltta ka bjp made prvesh kela pavitra hottat he jara sangave

 • Sham Dhumal

  मोदींची जादू नाही म्हणत होते. नंतर तो अनुभव आला ना? आता तर मोदींची सावलीसुध्दा पडू नये असे वाटत असेल तुम्हाला.

 • Ambarish Gore

  aaaho pawar saheb maharashtra pan Shivaji maharajanchya janmatithi varun gondhal aahe…toh kuthe mitvu shaklat tumhi 15 varshat..tumchi shivajayanti ani shivsene chi shivajayanti veg vaeglya tarkhela aste…he mahit asel na tumhala…ase tukar arop karnyapurvi vichar kara jara..

 • Ganesh mate

  तुमच्या परवानगीची गरज काय पवार साहेब ? छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त तुमचे कॉपी राईट कय…। नीट बोलत जा कधीतरी….

 • Varun Bidkar

  Ali……. Re……. Ali…. Sharad………Ata Tuzi Bari Ali…..Chu***

 • kumar chavan

  Jau de na bhau … tumche aramche divas ale ahet .. java ghari ata

close