उद्धव ठाकरेंची दखल घेतली जात नाही – नारायण राणे

October 10, 2014 10:28 AM0 commentsViews:

uddhav and rane

10 ऑक्टोबर :  उद्धव ठाकरेंच्या कुठल्याही गोष्टीची महाराष्ट्रातील जनता दखल घेत नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते नाराणय राणेंनी केली आहे. ते चांदूर रेल्वे इथे काँग्रेसचे उमेदवार विरेंद्र जगताप यांच्या प्रचारासाठी आले होते. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना ‘निरुद्योग मंत्री’ असं म्हटलं होतं. त्यावर राणेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे मी कसा मुख्यमंत्री होतो, शिवसेना प्रमुखांनी मला मुख्यमंत्री केले होते, उद्धव ठाकरेंच्या कुठल्याही गोष्टींची महाराष्ट्र दखल घेत नाही. कोकणातील जनताही घेणार नाही असा विश्वास व्यक्त करत कोकणाच्या विकासात उद्धव ठाकरेंचं कुठेच स्थान नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत. यावेळी राणेंनी राष्ट्रवादीवरही टीका केली आहे. काँग्रेस स्वबळावर सरकार बनवणार असून, यावेळी राष्ट्रवादीचे 40 आमदारही निवडून येणार नाहीत असं भाकितही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसचं मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे व दावेदारही आहे, असंही राणे म्हणाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close