बिग बी परत करणार ग्रीन्स लॅण्ड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलजीची डॉक्टरेट

May 30, 2009 11:14 AM0 commentsViews: 3

30 मे ऑस्ट्रेलियातल्या भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेर्धात बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऑस्ट्रेलियाच्या ग्रीन्स लॅण्ड युनिव्हर्सटी ऑफ टेक्नॉलजीची डॉक्टरेट परत करण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बीने त्यांचा निर्णय ब्लॉगवर जाहीर केला आहे. ग्रीन्स लॅण्ड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलजीने अमिताभला गेल्याच आठवड्यात डॉक्टरेट बहाल केली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर असं लिहिलंय की, त्यांना एक सच्चा देशवासी या नात्याने जगातल्या प्रत्येक भारतीय नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे रहायचं आहे. भारतीय नागरिकांचा अपमानही त्यांना होणार नाही. तसंच डॉक्टरेट परत करून त्यांना ऑस्ट्रेलियन शासनाचा आणि युनिव्हर्सिटीचा अपमान करायचा हेतू नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बिग बी यांनी त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत लोकांच्या प्रतिक्रिया स्वत:च्या ब्लॉगवर मागवल्या आहेत.

close