भाजपविरोधात बोलताना संयम बाळगा, स्वराज यांचा उद्धवना सल्ला

October 10, 2014 2:04 PM0 commentsViews:

swaraj on uddhav10 ऑक्टोबर : आम्ही सेनेवर न बोलण्याचा निर्णय घेतला होता, आणि उद्धव ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती असं सांगत विरोधी पक्षांवर बोलताना संयम बाळगावा असा सल्ला भाजपच्या नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलाय. उद्धव ठाकरेंनी भाजपची तुलना अफजल खान फौजेशी केली होती. त्याबद्दल सुषमा स्वराज कल्याणमधल्या सभेत बोलत होत्या.

कल्याणमध्ये झालेल्या सभेत पुन्हा एकदा सुषमा स्वराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर दु:ख व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. युती तुटल्यावर आम्ही शिवसेनेवर टीका करायचे नाही असे ठरविले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी ते पथ्य पाळले नाही, त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना अफजल खानाची फौज म्हटले, राजकारणात विरोधक असतात शत्रू नसतात. बाळासाहेब असताना त्याना त्यांचे कुटुंब एकसंध ठेवता आले नाही, त्याच पद्धतीने राजकीय युत्या बनतात आणि तुटतात असा टोला स्वराज यांनी उद्धवना लगावला. आम्ही ‘मातोश्री’चा आदर करतो, त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या विरोधात बोलणार नाही, त्यामुळे भाऊ उद्धव यांना माझे सांगने आहे की, टीका करताना संयम बाळगा, चार दिवसांची निवडणूक आहे, लोकशाही आहे उद्या सभागृहात एकत्रच बसायचे आहे असा सल्लाही स्वराज यांनी दिला. दरम्यान, तुम्ही अडवाणींची काय अवस्था करून ठेवलीये, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत लगावलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close