आवाज बसला तरी मोदींनी गाजवली सभा

October 10, 2014 2:22 PM0 commentsViews:

modi in amravati10 ऑक्टोबर : भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. रोज दोन ते तीन सभांचा धडाका मोदींना
लावला आहे. मात्र सारख्या भाषणांमुळे मोदींचा आवाज बसलाय. तरी सुद्धा मोदी यांनी अमरावती जिल्हयातील धामणगाव रेल्वे मतदारसंघात चांदुर रेल्वे इथं सभा घेतली आणि गाजवली.

आवाज बसला असतानाही मोदींनी हजेरी लावली. आपल्या 20 मिनिटांच्या भाषणात मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार सुरू आहे त्यावर काँग्रेसच टीका करत आहे पण आता वेळ बोलण्याची नाहीतर कृती करून दाखवण्याची आहे असं मोदींनी स्पष्ट केलं.

मात्र आपला आवाज बसल्यामुळे मोदींना भाषण आटोपत घ्यावं लागलं पण आवाज बसलेला असताना पंतप्रधान भाषण करण्यासाठी आले हे पाहून भाजपचे कार्यकर्त्यांनी मोदी…मोदी नावाचा एकच जयघोष केला.

विशेष म्हणजे मोदींच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. इथे 3 हेलीपॅड उभारण्यात आले होते. गेल्या 5 दिवसांपासून इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. एवढ्या लहानशा गावात पहिल्यांदाच पंतप्रधान येत असल्यानं इथल्या नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. पण मोदींनी आवाज बसलेला असताना त्यांना नाराज केलं नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close