30 मेला होणार 46 वा मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा

May 30, 2009 11:23 AM0 commentsViews: 6

30 मे डोक्यावर मोरपिसांची टोपी घालून ताल धरणारा वासुदेव… जोगवा मागत फिरणारे जोगते… मरीआई… वारकरी… छोट ज्ञानेश्वर असे सगळे एकाच ठिकाणी पहायला मिळाले. निमित्त होतं 46 वा मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा आणि त्या सोहळ्याची स्वागत शोभायात्रा… 30 मे संध्याकाळी पुण्याच्या छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात पार पडणार आहे. यावेळी राज्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील तसंच अजय सरपोतदार उपस्थित होते. जयवंत कुलकर्णी, लीला गांधी, मधू कांबीकर, आनंद अभ्यंकर, असे अनेक कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाले होते. वेगवेगळ्या चित्रपटांचे रथ तसंच पारंपारिक वेषातले कलाकार हे या शोभायात्रेचं आकर्षण ठरलं. 46 व्या मराठी चित्रपट परस्कार वितरण सोहळ्यात अभिनेत्री रेखा आणि आमिर खान यांना राज कपूर स्मृती पुरस्काराने तर जगदीश खेबुडकर आणि महेश कोठारेंना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

close