फक्त चार लाख सापडले हा अजित पवारांचा अपमान -संजय राऊत

October 10, 2014 3:24 PM0 commentsViews:

10 ऑक्टोबर :   निवडणुकीमध्ये सध्या पैशांचा पाऊस पडत आहे. त्यातचं निवडणूक आयोगाने माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बॅगेतून चार लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीचे पुढारी अजित पवारांच्या बॅगेत फक्त चार लाख रुपये सापडतात हा त्याचा अपमान आहे. त्यांचे नुसते खीसे जरी झटकले तरी 25 एक कोटी सहज पडतात आणि निवडणूक आयोगाला पवारांची बॅगेत फक्त चार लाख रुपये सापडले. यासारखा मोठा अपमान अजित पवारांचा गेल्या 25 वर्षात कधीचं झालेला नाही अशा शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close