कैलाश सत्यर्थी आणि मलालाला नोबेल पुरस्कार जाहीर

October 10, 2014 3:43 PM0 commentsViews:

Kailash Satyarthi10 ऑक्टोबर : यंदाच्या नोबेल शांतता पुरस्कारावर आशियाई ठसा उमटला आहे. ‘बचपन बचाओ आंदोलना’च्या माध्यमातून बालकामगार विरोधी चळवळ उभारणारे सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यर्थी यांना प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. तर त्यांच्यासोबत अखेरीस तालिबान्यांविरोधात लढा देणारी पाकिस्तानाची छोटीशी रणरागिणी मलाला युसुफझाई हिलाही नोबेल पुरस्कारने गौरवण्यात आलंय. नोबेल समितीने पुरस्कारांची घोषणा करत हिंदू आणि एक मुस्लीम तसंच भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर केला असं महत्वपूर्ण मत व्यक्त केलंय.

कैलाश सत्यार्थी यांचा जन्म मध्यप्रदेशमध्ये विदिशा या गावी 11 जानेवारी 1954 रोजी झाला. त्यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेत बचाव कार्य अभियान आणि बालकामगार विरोधी चळवळ उभारली यासाठी त्यांचा नोबेल पुरस्कारने सन्मान करण्यात आलाय. गेली दोन दशक त्यांनी बालकामाराच्या विरोधात लढा दिला. या आंदोलनाला त्यांनी जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण भारतीयांचा सन्मान आहे. हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. ज्यामुळे भारतातही लढाई उभी राहु शकली आणि जगभरात आपला विजय होत आहे. हा विजय त्या मुलांचा आहे जे आपलं जीवन बदलण्यासाठी संघर्ष करत आहे अशी प्रतिक्रिया सत्यर्थी यांनी दिली. सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला हा भारत आणि मध्यप्रदेशसाठी अभिमानास्पद बाब आहे असं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय. तर सत्यर्थी यांना मिळालेला हा पुरस्कार संपूर्ण भारतीयासाठी गर्वाची गोष्ट आहे. मी ज्यावेळेस सत्यार्थी यांना भेटेल तेव्हा त्यांना 21 तोफांची सलामी देईल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अनुपम खैर यांनी दिली. तर तालिबान्याविरोधात लढा देणारी मलाला युसुफझाई हिलाही या वर्षी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील वर्षी मलाला पुरस्काराने हुलकावणी दिली होती. मात्र वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर मलालाला पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. नोबेल पुरस्कार मिळवणारी मलालाही सर्वात लहान मानकरी ठरली आहे. तर कैलास सत्यर्थी नोबेल पुरस्कार मिळवणारे हे आठवे भारतीय ठरले आहे.

कैलास सत्यर्थी यांच्या कार्याचा आढावा

- बालहक्क कार्यकर्ते
– बालकामगार विरोधी चळवळ – बचपन बचाओ आंदोलन
– आतापर्यंत 80,000 बालकामगारांची सुटका केली
– त्यांचं पुनर्वसन आणि शिक्षण केलं
– ग्लोबल मार्च अगेंस्ट चाईल्ड लेबरमध्ये सहभाग

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close