ऑस्ट्रेलियातल्या हल्ल्यांबाबत भारतीय विद्यार्थ्यांनी केली निदर्शने

May 30, 2009 11:27 AM0 commentsViews: 1

30 मे ऑस्ट्रेलियात भारतीय तसंच भारतीय वंशांच्या विद्यार्थ्यांवर होणार्‍या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात भारतीय विद्यार्थ्यांनी निदर्शनं केलीत. रॉयल मेलबर्न हॉस्पिटलच्या बाहेर जमून या विद्यार्थ्यांनी हल्ल्यांचा निषेध केला. हल्ल्यात जखमी झालेला श्रावण कुमार सध्या या हॉस्पिटलमध्ये आहे. श्रावण आणि त्याच्या चार मित्रांवर दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी स्क्रूड्रायव्हरनं हल्ला केला होता. ऑस्ट्रेलियात गेल्या तीन आठवड्यांत भारतीय विद्यार्थ्यांवर चार हल्ले झालेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केव्हिन रूड यांनी या हल्ल्यांबद्दल खेद व्यक्त केलाय. भारतीयांच्या सुरक्षेसाठी उपाय योजण्याचं आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रूड यांना केलं आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियात काही प्रमाणात वर्णद्वेषाची समस्या असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाच्या भारतातल्या उच्चायुक्तांनी दिली आहे.

close