प्रचाराच्या रणधुमाळीत तीन मराठी चित्रपटांचा तडका !

October 10, 2014 5:13 PM0 commentsViews:

firday relaase

10 ऑक्टोबर : सध्या माहोल आहे प्रचाराचा. सर्वत्र केवळ प्रचाराचीच चर्चा आहे. आणि अशा वेळेस मतदानाच्या आधी तीन मराठी सिनेमे रिलीज होतायत आणि त्यापैकी एक आहे तो म्हणजे प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा सिनेमा. या चित्रपटात नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी हे आपल्याला एकत्रित काम करताना पहायला मिळणार आहेत. या सिनेमाबद्दल, तसंच नाना व सोनालीच्या भुमिकेबद्दल लोकंामध्ये बरीच उत्सुकता आहे.

त्याचबरोबर ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांचा, ‘पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा’ हा सिनेमाही रिलीज होतोय. हा सिनेमा ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या मकरंद अनासपुरे यांच्या सिनेमाचा दुसरा भाग लोकंाच्या भेटीस येतोय. पहिल्या भागातील धम्माल पाहुन लोकांच्या या सिनेमाकडून फार अपेक्षा आहेत आणि ऐन निवडणुकीचं औचित्य साधून हा सिनेमा येत असल्याने, सर्वांच्याच नजरा यावर खिळल्या आहे. या दोन सिनेमांबरोबरच आदिनाथ कोठारे आणि सुलग्ना यांचा हलकाफुलका, ‘इश्कवाला लव्ह’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close