दादांना ‘नोटा’ भोवणार ?, अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल

October 10, 2014 6:59 PM0 commentsViews:

ajit pawar parbhani cash10 ऑक्टोबर : परभणीत सापडलेल्या पैशांप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अडचणीत सापडले आहे. आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजित पवारांनी 1 लाखांपेक्षा जास्त रक्कम सोबत बाळगली आणि पक्षाकडून लेखी पुरावा न मिळाल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच जिल्हाध्यक्ष विजय भांबळेंसह चालकवरही गुन्हा दाखल झालाय.

दोन दिवसांपूर्वी परभणीमध्ये गंगाखेड-परळी नाक्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या गाडीत 3 बॅगा सापडल्या होत्या. या बॅगा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे स्वीय सहायक यांच्या असून त्यात 4 लाख 85 हजार,पवारांचे कपडे व व्हिजिटिंग कार्ड सापडले होते. जिंतुरहून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार विजय भांबळे यांची स्क्रॉपिओ क्रमांक एम एच 09-5210 ही गाडी गंगाखेड मार्गे लातूरला जात असताना परळी चेक पोस्टवर या गाडीची तपासणी करण्यात आली. यात 3 बॅगा असल्याने पोलिसांनी ही गाडी ठाण्यात घेवून जात तपासणी करण्यात आली. त्यावेळी ही रोकड सापडली. त्यावेळी . हे पैसे पक्षानंच प्रचारासाठी दिले आहेत, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयबीएन लोकमतकडे केला होता. तसंच अजित पवारांनी हे पैसे माझे नव्हते ते पक्षाचे होते 13 तारखेच्या प्रचारासाठी ही रक्कम वापरली जाणार होती असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं होतं. आता मात्र या प्रकरणी अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close