सीमारेषेच्या तणावावरुन गांधी -मोदींमध्ये जुंपली

October 10, 2014 9:15 PM1 commentViews:

rahul gandhi on modi4410 ऑक्टोबर : सीमारेषेवर पाकिस्तानकडून कुरापत्या सुरूच आहे. पाक सैनिकांनी सीमालगतच्या भागातील गावावर गोळीबार केला या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला पण यावरूनही राजकारण सुरू झालंय. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहे.

गेल्या 10 दिवसांत सीमेवर जितका गोळीबार झालाय तेवढा गेल्या 10 वर्षातही झालेला नाही अशी जळजळीत टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. लोकसभेच्या आधी ‘अच्छे दिन’ येणार असे आश्वासन दिले होते, ते अच्छे दिन कुठे आहे? असा सवालही राहुल यांनी विचारला.

तसंच पंतप्रधान मोदींची अमेरिकन औषध कंपन्यांशी हातमिळवणी केल्याने कॅन्सर, डायबेटीस, ब्लडप्रेशरसाठीची औषधं महागणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते सासवडमध्ये बोलत होते.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची आज पुण्यात सासवड इथं भव्य सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या 60 वर्षांमध्ये काहीच काम झालं नाही आणि मी एकटाच सगळं करणार असा आव मोदी आणत असतात, अशी खरमरीत टीका राहुल यांनी केली. सीमेवर गोळीबार होत आहे पण काँग्रेसचे नेते त्याचंही राजकारण करत आहे अशी टीका मोदींनी केली होती. मोदींच्या टीकेचा राहुल यांनी चांगलाच समाचार घेतला. गेल्या 10 दिवसांत सीमेवर जितका गोळीबार झालाय तेवढा गेल्या 10 वर्षातही झालेला नाही अशी आठवण राहुल यांनी करून दिली. सत्ता हातात दिल्यास आगामी काळात 30 लाख मराठी तरुणांना नोकर्‍या देणार आणि प्रत्येक गरिबाला घर देणार, उद्योगाधंद्यांचा विकास करणार व शेतकरी आणि शेतमजुरांकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे आश्वासनंही त्यांनी यावेळी दिले. तसंच मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलं काम केलं सांगून त्यांनी चव्हाणांवर स्तुतीसुमनं उधळली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Santosh

    Bindok salla!

close