शर्मिला ठाकरेंची ‘राज की बात’, उद्धव-राज एकत्र येतील !

October 10, 2014 11:59 PM0 commentsViews:

sharmila thackarey on uddhav10 ऑक्टोबर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा या निवडणुकीत रंगलीय. दोन्ही बाजूंनी तशा प्रकारचे संकेतही दिले जात आहे. निवडणुकीनंतर राज आणि उद्धव ठाकरे नक्कीच एकत्र येऊ शकतात, असं वक्तव्य खुद्द राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलंय. ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्र जिंकता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीच्या आधीच राज-उद्धव एकत्र यायला हवे होते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. दुसरीकडे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही अशाच प्रकारचे संकेत दिले आहे. आम्ही एकटे लढत आहोत एकटं जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय राऊत यांचं वक्तव्य मी ऐकेलं नाही. पण आम्ही स्वबळावर लढत आहोत. सत्तेवर आल्यावर जो कुणी महाराष्ट्र घडवायला सोबत येईल त्यांना आम्ही चांगली वागणूक देऊ आणि सोबत घेऊ असं आदित्य म्हणाले. विशेष म्हणजे कालपर्यंतही ही चर्चा इतर नेत्यांकडून होत होती आता मात्र दोन्ही ठाकरे घरचे सदस्य एकत्र येण्यासाठी पुढाकार घेत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close